Join us
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांचे अनैतिक संबंध बेतले जिवावर?

By admin | Updated: July 2, 2017 06:41 IST

जिवापाड प्रेम करणाऱ्या वडिलांचे अनैतिक संबंध विवान संदीप कांडू या दीड वर्षीय मुलाच्या जिवावर बेतल्याचा संशय पोलिसांना

 लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जिवापाड प्रेम करणाऱ्या वडिलांचे अनैतिक संबंध विवान संदीप कांडू या दीड वर्षीय मुलाच्या जिवावर बेतल्याचा संशय पोलिसांना आहे. हत्येप्रकरणी गुरुवारी त्याच्या काकीला मालाड पोलिसांनी अटक केली. इंदू धर्मेंद्र गुप्ता (३६) असे तिचे नाव असून, तिने अद्याप गुन्ह्याची कबुली दिलेली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.इंदू ही विवानची चुलत काकी आहे. विवानचा मृतदेह मंगळवारी सापडला. तेव्हा मालाड पोलिसांनी तिला आणि तिच्या नवऱ्याला ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत इंदूने दिलेल्या जबाबात पोलिसांना तफावत जाणवली. तसेच तिचे वागणेदेखील संशयास्पद होते. इंदू आणि विवानचे वडील संदीप यांच्यात अनैतिक संबंध होते. त्यानुसार हे दोघे वरचेवर एकमेकांना भेटायचे. संदीपने त्याच्या पत्नीला सोडावे असा तगादा इंदूने लावला होता. मात्र विवानवर जिवापाड प्रेम असल्याने हे शक्य नसल्याचे संदीपने तिला सांगितले. त्यामुळे प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या विवानचा तिने काटा काढला, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच तिच्या विरोधात परिस्थितीजन्य पुरावे पोलिसांना सापडले आहेत. त्याच्याच आधारे ही अटक करण्यात आले असून तिने गुन्हा कबूल केलेला नाही, असेही या अधिकाऱ्याने नमूद केले.