Join us

मुलींची हत्या करत बापाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:19 IST

आर्थीक चणचणीतुन उचलले टोकाचे पाऊलमुलींची हत्या करून बापाची आत्महत्याकांदिवलीतील घटनालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गळफास घेतलेल्या ...

आर्थीक चणचणीतुन उचलले टोकाचे पाऊल

मुलींची हत्या करून बापाची आत्महत्या

कांदिवलीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गळफास घेतलेल्या अवस्थेत अजगर अली जब्बार अली (४५) नामक व्यक्तीचा मृतदेह राहत्या घरी सापडला. कांदिवलीत गुरुवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला असून मुलींची हत्या करत नंतर बापाने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. आर्थिक चणचणीतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सुसाईड नोटमधून उघडकीस आले.

अली यांचा लालजीपाडा येथील खान गल्लीमध्ये लोखंडाच्या डाय बनविण्याचा स्वतःचा कारखाना आहे. ते मालवणीमध्ये भाडेतत्त्वावर राहत होते. कारखाना बघायला चला, असे सांगून ते गुरुवारी सकाळी कनेन (१३) व सुझेन (८) या आपल्या दाेन मुलींना घेऊन गेले. त्यानंतर संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह कारखान्यात आढळला. तर दोन्ही मुली बेशुद्धावस्थेत सापडल्या. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान डाॅक्टरांनी केले.

अली यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्यांना आर्थिक चणचणीतून जावे लागत होते. यामुळे कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी लिहिले आहे. कांदिवली पोलिसांनी तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले असून अधिक तपास सुरू आहे.