Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याला अटक

By admin | Updated: January 24, 2016 00:44 IST

जन्मदात्या पित्याकडूनच १४ वर्षांच्या मुलीचे लंैगिक शोषण होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. घाटकोपर पोलिसांनी त्याला अटक केली असून, गेल्या दोन वर्षांपासून

मुंबई : जन्मदात्या पित्याकडूनच १४ वर्षांच्या मुलीचे लंैगिक शोषण होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. घाटकोपर पोलिसांनी त्याला अटक केली असून, गेल्या दोन वर्षांपासून तो आपल्या मुलीवर अत्याचार करीत होता. शाळेतील शिक्षिका आणि स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यामुळे त्याच्या गुन्ह्याला वाचा फुटली.अटक करण्यात आलेला ही व्यक्ती ४५ वर्षांचा रिक्षाचालक आहे. तो घाटकोपर पश्चिम परिसरात मोठा मुलगा व १४ वर्षांच्या रीना (बदललेले नाव) यांच्यासमवेत राहतो. आईचे छत्र हरपल्याने रीना शाळा शिकतच घरातील कामे करते. दुपारी शाळेतून आल्यावर रीनावर तिचा बाप लैंगिक अत्याचार करून ठार मारण्याची धमकी देत असे, त्यामुळे रीना निमूटपणे अत्याचार सहन करीत होती. शुक्रवारी रीनाच्या शाळेत पालक सभा होती. मात्र, तिचे वडील न आल्याने, शिक्षिकेने तिला विश्वासात घेऊन विचारल्यावर रडणाऱ्या रीनाने पित्याकडून होत असलेले दुष्कृत्य सांगितले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, त्यांनी परिसरातील एका स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला व त्यांच्या मदतीने घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर या विकृत पित्याला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (पॉस्को) गुन्हा दाखल करून अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकट पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पालक सभेला वडील का आले नाहीत, हे विचारल्यावर या पीडित मुलीला उत्तर देता आले नाही. तेव्हा काहीच न बोलणाऱ्या या मुलीला विश्वासात घेतल्यावर तिने हा प्रकार शिक्षिकेला सांगितला.