Join us
Daily Top 2Weekly Top 5

किन्नरसह दोघांवर जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:07 IST

सांताक्रुझमधील प्रकार : आराेपीचा शाेध सुरूलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जुन्या वादातून एका किन्नरसह दोघांवर रविवारी सांताक्रुझ परिसरात ...

सांताक्रुझमधील प्रकार : आराेपीचा शाेध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जुन्या वादातून एका किन्नरसह दोघांवर रविवारी सांताक्रुझ परिसरात जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.

इकलास मंडळ (२९) असे जखमी रिक्षाचालकाचे तर डॉली उर्फ विठ्ठल पोकळे असे जखमी किन्नरचे नाव आहे. डॉलीचे एका व्यक्तीसोबत जुने वाद होते. त्या कारणावरून रविवारी त्या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यातूनच त्या व्यक्तीने डॉलीचा गळा, हनुवटी, गालावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हे मंडळने पाहिले आणि तो डॉलीला वाचवायला गेला. त्या झटापटीत त्याच्याही हातावर वार करण्यात आल्याने तो जखमी झाला. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाला. डॉली आणि मंडळला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलीस आराेपीचा शोध घेत आहेत.

..............................