Join us  

दरड कोसळून बेघर झालेल्या कुटुंबाचे आझाद मैदानात उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 10:24 PM

दोन वर्षापासून बेघर विरकर कुटुंबाचे केवळ स्थलांतर.

श्रीकांत जाधव, मुंबई : चुनाभट्टी परिसरात दोन वर्षापूर्वी दरड कोसळून बेघर झालेल्या कुटुंबाला अद्याप स्वतःच्या हक्काचे घर मिळालेले नाही. वारंवार विनंती अर्ज करून सुद्धा शासन लक्ष देत नसल्यामुळे साधना विरकर त्यांच्या कुटुंबासह आज़ाद मैदानात आमरण उपोषण सुरु केले आहे. उपोषणकर्त्या साधना विरकर यांच्या कुटुंबासाठी राईट टू शेल्टर संस्थेचे अध्यक्ष अँड. संतोष सांजकर आझाद मैदानात पाठिंबा देत आहेत.

चुनाभट्टी येथे जुलै २०२२ रोजी दरड़ कोसळून साधना विरकर यांचे घर गाढले गेले होते. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधि यांनी त्यांना घर देण्याचे आश्वासन दिले. परंतु आजतागायत घर मिळालेले नाही. पालिका एल वार्ड विभागाने विरकर कुटुंबाला पालिकेच्या एका पडीक शाळेत तात्पुरते स्थलांतर केले. वर्षभर त्या पडीक शाळेमध्ये राहिल्यानंतर त्या कुटुंबाला दुसऱ्या पालिकेच्या नेहरू नगर शाळेमध्ये स्थलांतरित केले. या शाळेमध्ये सुद्धा ७ महीने घालविल्यानंतर आता निवडणुकीचे कारण सांगून त्या कुटुंबाला दुसरीकडे स्थलांतरित न करता रस्त्यावर आणले आहे. मागील दोन वर्षापासून त्या कुटुंबाचे केवळ स्थलांतर करण्यात आले. परंतु त्यांचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही. अखेर त्बाविरकर कुटुंबाने आझाद मैदानात आंदोलन सुरु केले आहे.

टॅग्स :मुंबई