Join us
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणामुळे मागण्या मान्य

By admin | Updated: December 17, 2014 23:30 IST

येथील आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी, जव्हार अंतर्गत असलेल्या शासकिय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी काही समस्या

हुसेन मेमन, जव्हारयेथील आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी, जव्हार अंतर्गत असलेल्या शासकिय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी काही समस्या व नवीन हॉस्टेलची इमारत मोडकळीस आल्यामुळे आम्हाला तात्काळ दुसऱ्या ठिकाणी स्थालांतर करा अशी मागणी केली आहे. ती पूर्ण व्हावी यासाठी दोन्ही हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांनी गेटला कडी लावून समस्या दुर होईपर्यत बुधवार दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी ६.३० पासून आमरण उपोषण सुरू केले होते.प्रकल्प कार्यालयामार्फत जव्हार येथे जुने व नवीन वस्तीगृह आहे. जुन्या व नविन वस्तीगृहात ३७५ विद्यार्थी राहत असुन, जुने वस्तीगृह हे शासनाच्या इमारतीत आहे. परंतु, नवीन वस्तीगृह हे भाड्याच्या जागेत आहे. नवीन वस्तीगृहात सर्व सोयीसुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे व इमारत मोडकडीस आल्यामुळे विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारत उपोषण सुरू केले, यासोबत त्यांच्या इतर किरकोळ मागण्याही होत्या त्याही त्यांनी समोर मांडल्या, ही माहिती मिळताच प्रकल्प अधिकारी अभिमन्यू मगर यांनी तात्काळ वस्तीगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, आणी ताबडतोब जव्हार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी खोडके यांना बोलावून पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली, त्यावेळी खोडके यांनी लवकरात लवकर तुम्हाला पर्यायी व्यवस्था करून देतो असे आश्वासन दिले. त्यानंतर विद्युतपुरवठ्याची मुख्य वायर शॉट सर्किटमुळे जळाली होती, ती ही तात्काळ एम.एस.ई.बी.च्या कर्मचाऱ्यांकडून मागवून बसवूण घेतली, आणि वीजपुरवठा सुरळीत सुरू केला. तसेच विद्यार्थ्यांच्या जेवणाबाबत काही समस्या होत्या त्याही मेस ठेकेदारास बोलवून समस्या दूर केल्या त्यामुळे दुपारी ४.०० वा उपोषण मागे घेतला. (वार्ताहर)