Join us
Daily Top 2Weekly Top 5

तेजीला ‘ब्रेक’; निफ्टी 8,1क्क् अंकाखाली

By admin | Updated: September 5, 2014 02:51 IST

गुंतवणूकदारांनी बांधकाम, धातू, भांडवली सामान, आयटी व बँकिंग शेअरमध्ये नफेखोरी केल्याने आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आपल्या विक्रमी पातळीवरून माघारी आला.

मुंबई : गुंतवणूकदारांनी बांधकाम, धातू, भांडवली सामान, आयटी व बँकिंग शेअरमध्ये नफेखोरी केल्याने आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आपल्या विक्रमी पातळीवरून माघारी आला. सेन्सेक्स 54 अंकांच्या घसरणीसह 27,क्85.93 अंकावर बंद झाला. अशा प्रकारे, गेल्या 9 दिवसांपासून उच्चंकी घोडदौड सुरू असलेल्या सेन्सेक्सला गुरुवारी ‘ब्रेक’ लागला.
मुंबई शेअर बाजाराचा 3क् शेअरवाला सेन्सेक्स एकावेळी घसरणीसह 26,972.39 अंकांर्पयत आला होता. मात्र, नंतर विदेशी कोषातून मोठी मागणी झाल्याने सेन्सेक्सच्या घसरणीला अंशत: लगाम लागल्याने काहीसा दिलासा मिळाला. अखेरीस सेन्सेक्स 54.क्1 अंक वा क्.2क् टक्क्यांच्या घसरणीसह 27,क्85.93 अंकावर बंद झाला.
यंदा आतार्पयतचा सर्वाधिक तेजीचा सिलसिला असलेल्या 9 दिवसांदरम्यान सेन्सेक्स 825.65 अंक वा 3.14 टक्क्यांनी वधारला. काल सेन्सेक्स आपल्या सार्वकालिक उच्चंकी पातळी 27,139.94 अंकावर बंद झाला होता. दिवसभरात 27,225.85 अंकासह उच्चंकी पातळीही गाठली होती. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 8,क्6क्.9क् अंकांर्पयत खाली आल्यानंतर अखेरीस 18.65 अंक वा क्.23 टक्क्यांच्या घसरणीसह 8,क्95.95 अंकांवर बंद झाला. निफ्टी काल आपल्या सार्वकालिक उच्चंकी पातळी 8,114.6क् अंकावर बंद झाला. व्यवहारात निफ्टीने सार्वकालिक उच्चंक 8,141.9क् अंकालाही स्पर्श केला होता. (प्रतिनिधी)
 
डीएलएफच्या शेअर्समध्ये 8.6क् टक्क्याने घसरण
च्बोनान्झा पोर्टफोलिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश गोयल यांनी सांगितले की, कमजोर जागतिक कल व कच्च्या तेलाचे भाव वधारल्याने बाजार धारणोवर नकारात्मक परिणाम झाला. यामुळे सर्व क्षेत्रंतील शेअर्सवर विक्रीसाठी दबाव राहिला.
च्पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने डीएलएफचे गुडगाव येथील 35क् एकर जमीन वाटप रद्द करण्याचा निर्णय काल सुनावला होता. यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये 8.6क् टक्क्यांची घसरण झाली आहे.
च्सेन्सेक्सवरील कंपन्यांमध्ये भेलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 4.44 टक्क्यांनी घसरण नोंदली गेली. हिंदाल्कोचे शेअर्सही 3.4क् टक्क्यांनी घसरले.