मुंबई : हिंदी चित्रपटात दाखवली जाणारी ‘वस्तू’ फॅशन स्टेटमेंट म्हणून तरुणाई लगेचच उचलत असल्यानेच मध्यंतरी गॉगल्सची मागणी वाढली होती. आता चित्रपटामुळे नाही तर उन्हाच्या झळांमुळे पुन्हा एकदा बाजारपेठांमध्ये गॉगल्सचे विविध प्रकार दिसू लागले आहेत. ऑक्टोबर हीटपासून डोळ्यांचा बचाव करण्यासाठी सर्वच वयोगटातील व्यक्ती सध्या गॉगल्स, स्टोल्स, टोपी यांची खरेदी करताना दिसत आहेत.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात वाढ झालेली आहे. सूर्यकिरणांचा थेट मारा, त्यातच दूर अंतरावर भासणारे मृगजळ यामुळे डोळ्यांना अधिक त्रस होत असल्याने गॉगलचा वापर केला जातो. सध्या मुलींमध्ये मोठय़ा आकाराच्या गॉगल्सची मागणी अधिक असून मुलांमध्ये काळ्या रंगाच्या ग्लास असलेल्या गॉगलची मागणी जास्त आहे. प्लास्टिक आणि धातूची फ्रेम असणारे गॉगल्स जास्त प्रमाणात दिसून येत आहेत.
डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी गॉगल्स वापरतानाच त्याचबरोबर
मुली स्टोल्सही वापरतात. उन्हामध्ये चालताना डोक्याला ऊन लागू
नये म्हणून मुलींमध्ये स्टोल्स गुंडाळण्याची फॅशन आहे. उन्हाळ्यात स्टोल वापरायचे असल्यामुळे
सुती, कॉटनच्या स्टोल्सना पसंती मिळत आहे. हे स्टोल्स दुकानात
विकत घेतल्यास त्याची किंमत 25क्
ते 5क्क् रुपये इतकी आहे, तर
रस्त्यावर मिळणा:या स्टोल्सची
किंमत ही 1क्क् ते 15क् रुपयांदरम्यान आहे. (प्रतिनिधी)
1क्रॉफर्ड मार्केट, फॅशन स्ट्रीट, सीएसटी स्टेशनजवळ, वांद्रे लिंकिंग रोड, जनता मार्केट, नटराज मार्केट इत्यादी ठिकाणी रस्त्यावर अथवा लहान दुकानांमध्ये गॉगल्सची विक्री होत आहे. येथे तरुणांच्या बरोबरीनेच मध्यमवयीन व्यक्तीही दुकानांवर खरेदीसाठी गर्दी होत आहे.
2ब्रॅण्डेड गॉगल्सच्या किमती या हजारोंच्या घरात आहेत. मात्र रस्त्यावर मिळणा:या गॉगल्सच्या किमती या 15क् ते 4क्क् रुपये इतक्या आहेत. बॅ्रण्डेड कंपनीचे नाव असलेले मात्र डुप्लिकेट गॉगल्सही बाजारात विकले जात आहेत. या गॉगल्ससाठी 3क्क् ते 45क् रुपये आकारले जात असल्याचे क्रॉफर्ड मार्केटमधील एका विक्रेत्याने सांगितले.