Join us

शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावी - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:33 IST

शेतक-यांना दिलेली आश्वासने सरकाराने पाळली नाहीत. शेतक-यांबाबत सरकारची नियत चांगली दिसत नाही. त्यामुळे शेतक-यांनी त्यांचे प्रश्न सुटेपर्यंत टोकाची भूमिका घ्यावी, असे आवाहन राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.

मुंबई : शेतक-यांना दिलेली आश्वासने सरकाराने पाळली नाहीत. शेतक-यांबाबत सरकारची नियत चांगली दिसत नाही. त्यामुळे शेतक-यांनी त्यांचे प्रश्न सुटेपर्यंत टोकाची भूमिका घ्यावी, असे आवाहन राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.पत्रकारांशी बोलताना खा. पवार म्हणाले, चार वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्पादन खर्च अधिक ५० टक्के फायदा हा शेतीमालाच्या किमतीचा आधार धरला जाईल आणि त्या पद्धतीने पाऊले टाकली जातील असे जागोजागी सांगत होते. पण गेल्या चार वर्षात याची अंमलबजावणी झाली नाही. दिल्लीसह दक्षिण भारत, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेतकºयांच्या या संघर्षात सर्वांनाच उतरावे लागेल. त्यांना पाठबळ द्यावे लागेल.शेतकºयांनी रस्त्यावर दूध आणि भाजीपाला फेकण्याऐवजी गोरगरिबांना द्यावा. जेणेकरून कष्टाने पिकवलेल्या मालाची नासाडी होणार नाही आणि गरीबांची सहानुभूती आपल्याला मिळेल. शेतकºयांनी या आंदोलनात सामान्य माणसाला त्रास होईल असे कोणतेही काम करू नये असे आवाहनही पवार यांनी केले.पालघरमध्ये बळाचा वापरनुकत्याच झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकांत दहा पैकी ९ जागी भाजपा पराभूत झाली. त्यामुळे बदलत चाललेले जनमत लक्षात घेऊन आता समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची भूमिका घेतली पाहिजे, असेही पवार म्हणाले.पालघरचा विजय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितल्यानुसार साम, दाम, दंड, भेद या वृत्तीने मिळवलेला आहे. शनिवार, रविवार बँका चालू ठेवायला सांगून पैशांचे वाटप केले गेले. ज्या जिल्हाधिकाºयाने यात सहभाग घेतला त्यांना पुढची ८ वर्षे निवडणूक काम देऊ नये असे निवडणूक आयोगानेच जाहीर केले आहे.अशा अधिकाºयास सरकारने एक मिनीटही पदावर ठेवायला नको. तरच प्रशासन पारदर्शी आहे असे म्हणता येईल, असा चिमटाही पवारांनी काढला. निवडून आलात आता शांत बसू नका, पक्षासाठी फिरा, असा सल्ला खा.पवार यांनी भंडारा-गोंदियाचे नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांना दिला. कुकडे यांनी पवार यांची मुंबईत भेट घेतली.

टॅग्स :शरद पवार