Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आपल्या गाण्याने तमाम संगीतप्रेमींना भुरळ घालणाऱ्या प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी बुधवारी अंधेरीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आपल्या गाण्याने तमाम संगीतप्रेमींना भुरळ घालणाऱ्या प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी बुधवारी अंधेरीत रक्तदान करत तरुणाईला रक्तदानासाठी प्रोत्साहित केले.

एकीकडे रक्ताची चणचण भासत असताना आता १८ ते ४४ वयाेगटातील नागरिकांनी लसीकरणापूर्वी रक्तदान करावे, यासाठी त्यांना प्राेत्साहित करण्यासाठी सोनू निगमने पुढाकार घेतला. अंधेरी पश्चिम येथील भाजप आमदार अमित साटम यांच्या आदर्श फाउंडेशनतर्फे बुधवारी जुहू येथील विद्यानिधी शाळेत आयोजित रक्तदान शिबिरात सोनू निगम यांनी प्रथम रक्तदान केले. यावेळी ते म्हणाले की, लसीकरणापूर्वी तरुणांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करण्याचा आमदार अमित साटम यांचा रक्तदान शिबिराच्या आयोजनाचा हा उपक्रम स्तुत्य आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी लसीकरणापूर्वी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, यासाठीच मी येथे स्वतः रक्तदान केले आहे.

कूपर हॉस्पिटल येथे गेल्या आठवड्यात रक्तदान करणाऱ्या ९९ वर्षांच्या गोल्फर कृषी टेकचंदानीनेही तरुणांना रक्तदानासाठी प्रोत्साहित केले.

दरम्यान, बुधवारच्या रक्तदान शिबिरात ५३ पिशव्या रक्तसंकलन झाले असून, गुरुवारीही येथे रक्तदान शिबिर आयोजित केल्याचे आमदार अमित साटम यांनी सांगितले.

यावेळी सोनू निगम, कृषी टेकचंदानी व आमदार अमित साटम यांनी के. पश्चिम वॉर्डचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांना रुग्णवाहिकांमध्ये ठेवण्यासाठी ऑक्सिजन कॉन्संट्रेटर सुपुर्द केले.

..................