Join us

तुरटीविषयी व्हायरल संदेश चुकीचा; पोलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 07:18 IST

तुरटीच्या वापराने विषाणू नष्ट होतात असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नावाने शेअर केला जात आहे.

मुंबई : तुरटीच्या वापराने विषाणू नष्ट होतात असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नावाने शेअर केला जात आहे. मात्र, हा संदेश चुकीचा असून पोलिसांत तक्रार केल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले.पालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांना विचारले असता, अशा प्रकारचा संदेश आपण पाठवला नसल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्या समुहावर किंवा वैयक्तिक असा संदेश आला असल्यास डॉ. पद्मजा केसकर यांचे नाव ग्राह्य धरू नये, असे त्या म्हणाल्या. तसेच, याविषयी पोलिसांत तक्रार करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.विनापरवाना सॅनिटायझरचे उत्पादन करणाऱ्यांवर कारवाईमुलूंड नाहूर येथे सिद्धिविनायक डायकेम. प्रा.लि कंपनीकडून विनापरवाना सॅनिटायझरचे उत्पादन घेण्यात येत होते. ही माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला (एफडीए) मिळताच बुधवारी त्यांनी कंपनीवर कारवाई कररत सुमारे २५ लाख रुपयांचा साठा जप्त केला.

टॅग्स :सोशल व्हायरलमुंबई