कल्याण - सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशावरून आणि राज्य शासनाच्या सूचनेवरून जे राष्ट्रीय फेरीवाला धोरण अमलात आणावयाचे आहे, त्याअंतर्गत केल्या जाणाऱ्या फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणाला उशिरा का होईना मुहूर्त लागला असताना सर्वेक्षणाची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप फेरीवाला संघटनांकडून केला जात आहे. त्यामुळे मुंबई, ठाणेपाठोपाठ कल्याण-डोंबिवली महापालिकेचेही सर्वेक्षण वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. अॅबल सॉफ्टवेअर या संस्थेमार्फत सर्वेक्षण केले जात आहे. महापालिका क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची जागेवर जाऊन मोजणी केली जात असताना हे सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप फेरीवाला संघटनांकडून केला गेल्याने सर्वेक्षणाबाबत प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विश्वासात न घेता सर्वेक्षण सुरू असून यामुळे बोगस फेरीवाल्यांची नोंदणी होण्याची भीती संघटनांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
फेरीवाल्यांचे सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीने
By admin | Updated: October 16, 2014 00:29 IST