महाड : मृताच्या नावे खोटे दस्तावेज बनवून जमीन लाटण्याचा गैरव्यवहार महाड तालुक्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी उरण येथील सोळा जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.वाळवा बुद्रुक येथील दगडू धोंडू तांबे या मृत व्यक्तीच्या नावाने असलेली (स.नं. ७, हिस्सा क्र. ५, क्षेत्र ०-८५-० ) या जमिनीचे बनावट अखत्यारपत्र तयार केल्याची तक्रार तांबे यांचा मुलगा सखाराम तांबे यांनी पोलीस ठाण्यात दिली, त्यानुसार बोकडविरा येथील सुभाष पाटील, लक्ष्मीबाई शेडगे, निर्मला पाटील, बबन पाटील, रमेश पाटील, संजय पाटील, राजेश कृष्णा पाटील, विजय पाटील, शैला पाटील, प्रवीण पाटील, देवेंद्र पाटील, महेंद्र पाटील, रुपाली पाटील, सीताराम जाधव, महादू पाटील, रुपाली पाटील, मुश्ताफ ताज यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (वार्ताहर)
मृताच्या नावे खोटे दस्तावेज
By admin | Updated: December 19, 2014 22:54 IST