Join us
Daily Top 2Weekly Top 5

बनावट दारूच्या अड्ड्यावर छापा, दोघांना अटक

By admin | Updated: May 29, 2016 01:53 IST

नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट दारू तयार करणाऱ्या एका अड्ड्यावर गुरुवारी रात्री राज्य उत्पादनाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या कारवाईत अडीच लाख रुपये किमतीची बनावट

मुंबई : नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट दारू तयार करणाऱ्या एका अड्ड्यावर गुरुवारी रात्री राज्य उत्पादनाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या कारवाईत अडीच लाख रुपये किमतीची बनावट दारू हस्तगत करून चंदन ककोटेईल आणि रंजन मयती या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.काही दिवसांपासून फोर्ट परिसरातील एका घरामध्ये बनावट दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादनाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या दारूच्या बाटल्यांवर नामांकित कंपन्यांचे लेबल लावून तिची बाजारात विक्री करण्यात येत होती. त्यानुसार छापा टाकत तेथे काम करणाऱ्या रंजनला ताब्यात घेण्यात आले. शिवाय विविध कंपन्यांचे लेबल लावलेली अडीच लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली. या आरोपीकडे पोलिसांनी चौकशी केली असता हा बनावट दारूचा व्यवसाय चंदन करत असल्याचे त्याने सांगितले. (प्रतिनिधी)