मुंबई : रेल्वे तिकिटांचा आॅनलाइन काळाबाजार सुरूच असून, शनिवारी १0 लाख १३ हजार ५९३ रुपये किमतीची ३३७ तिकिटे आरपीएफ (रेल्वे पोलीस दल) आणि रेल्वेच्या दलालविरोधी पथकाकडून हस्तगत करण्यात आली. या वेळी १० जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वे आरपीएफकडून देण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे तिकिटे काढण्यासाठी तब्बल ३00 बनावट पर्सनल आयडी बनविण्यात आले होते. आरपीएफ आणि दलालविरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनंतर शनिवारी खेरवाडी येथे छापा टाकण्यात आला. या वेळी छाप्यात गुप्ता टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल एजन्सीच्या मालकासोबत आणखी नऊ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल १0 लाख १३ हजार ५९३ रुपये किमतीची ३३७ तिकिटे हस्तगत करण्यात आली. त्याचबरोबर १० मोबाइल, १५ कॉम्प्युटर आणि साडेसात हजार रुपयांची रोख रक्कमही सापडली. महत्त्वाची बाब म्हणजे ३३७ तिकिटांपैकी १00 तिकिटे ही तत्काळ कोट्यातील असल्याचे पश्चिम रेल्वे आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आनंद झा यांनी सांगितले. गुप्ता टूर्स अॅण्ड ट्रॅव्हलकडून आरक्षित तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्या वेळी डोमेन पत्ता तपासण्यात आला असता या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात तिकिटे काढण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. मात्र दलालांकडून पर्सनल आयडी वापरण्यात येत असल्याने त्यांच्यापर्यंत पोलिसांना पोहोचणे मुश्कील होत होते. त्यामुळे तज्ज्ञांची मदत घेण्याचा निर्णय झाला आणि अधिक तपास केल्यानंतर तिकिटांच्या पेमेंटची माहिती काढण्यात आली. यातून सर्व तिकिटे गुप्ता टूर्स अॅण्ड टॅव्हलकडून बनावट आयडी वापरून काढण्यात येत असल्याचे समोर आले. तब्बल ३00 बनावट पर्सनल आयडीमधून ही तिकिटे काढण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. एका पर्सनल आयडीतून महिन्याला १० तिकिटे काढण्यात येत होती. यातील १० जणांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)च्अनधिकृत दलालांकडून अशाप्रकारे ई-तिकिटांमध्ये गैरप्रकार सुरु केले असतानाच यामध्ये आयआरसीटीसीचे अधिकृत दलालही आघाडीवर असल्याचे पश्चिम रेल्वे आरपीएफच्या (केंद्राचे रेल्वे पोलिस दल) निदर्शनास आले आहे. च्२0१३ ते २0१५ (माचपर्यं)पर्यंत अनधिकृत दलालांविरोधात केलेल्या कारवाईत २३९ केसेस करण्यात आल्या असून यामध्ये २६७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. च्अनधिकृत दलालांविरोधात कारवाई होत असतानाच आयआरसीटीसीचे अधिकृत दलालही ई-तिकिटांमध्ये गैरप्रकार करत असल्याचे रेल्वे पोलिसांच्या लक्षात आले आणि त्याविरोधात केलेल्या कारवाईत २२ केसेसमध्ये २९ जणांविरोधात गुन्हे दाखल झाले.
रेल्वे तिकिटांसाठी बनावट आयडी
By admin | Updated: May 11, 2015 02:20 IST