मुंबई : खासदार अरविंद सावंत यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करून त्याद्वारे पैशांची मागणी केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. सोमवारी सावंत यांनी याबाबत सायबर पोलिसांकड़े तक्रार दिली. त्यांच्या अर्जाआधारे सायबर पोलिसांनी फेसबुककडे बनावट खात्याशी संबंधित तपशिलाची मागणी केली असून त्याआधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.
बनावट फेसबुक अकाउंटप्रकरणी तपास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:08 IST