Join us
Daily Top 2Weekly Top 5

कारची परस्पर विक्री करणाऱ्या ठगाला बेड्या

By admin | Updated: January 12, 2017 06:39 IST

कॉलसेंटरमध्ये भाडे तत्त्वावर कार देण्याचे सांगत त्याची परस्पर विक्री करणाऱ्या ठगाला मंगळवारी दिंडोशी

मुंबई : कॉलसेंटरमध्ये भाडे तत्त्वावर कार देण्याचे सांगत त्याची परस्पर विक्री करणाऱ्या ठगाला मंगळवारी दिंडोशी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अजय रघुनाथ साळुंखे (३४) असे या ठगाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळुंखे हा काही महिन्यांपासून कार मालकांकडून कार घ्यायचा. ती गाडी कॉलसेंटरमध्ये भाडे तत्त्वावर देऊन त्याचे महिना भाडे मालकाला देण्याचे कबूल करायचा. मात्र प्रत्यक्षात ती कार परस्पर विकून तो पसार होत असे. महिनाभराने तो मालक भाडे घेण्यास आला की त्याचीच कार विकून मिळालेल्या पैशातील काही रक्कम त्याला द्यायचा. अशा प्रकारे त्याने तीन ते चार जणांना चुना लावला आहे. ही बाब कारमालक अकबर यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनंतर साळुंखेचा प्रताप उघडकीस आला. (प्रतिनिधी)