Join us

बिघाडामुळे प्रवाशांचे हाल

By admin | Updated: February 22, 2017 04:50 IST

मुंबई-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये सोमवारी रात्री ११ च्या सुमारास वासिंद येथे बिघाड झाला. त्यामुळे

डोंबिवली : मुंबई-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये सोमवारी रात्री ११ च्या सुमारास वासिंद येथे बिघाड झाला. त्यामुळे कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल, तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबून राहिल्या. परिणामी, हजारो प्रवाशांचे हाल झाले, तर मंगळवारी सकाळी दिवा स्थानकाजवळ रुळाच्या सांध्याचा भाग निघाल्याने आणि आसनगाव-वासिंद दरम्यान अप मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेल्याने, तब्बल एक तास वाहतूक ठप्प झाली. इंजिन बिघाडामुळे टिटवाळा, आसनगाव, कसारा लोकलमधील प्रवासी विविध स्थानकांमध्ये अडकून पडले. दिवा स्थानकात मध्यरात्री १२.१५च्या सुमारास आलेली टिटवाळा लोकल डोंबिवलीत पोहोचण्यासाठी अर्धा तास लागला. त्यानंतर, ती मध्यरात्री पाऊणच्या सुमारास डोंबिवलीत फलाट क्रमांक दोनवर अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आली. त्या पाठोपाठ कल्याण, तसेच कर्जत दिशेकडील लोकलही मुंब्रा व दिवा स्थानकांदरम्यान खोळंबल्या होत्या. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. (प्रतिनिधी) दिवा-मुंब्रादरम्यान रुळात तांत्रिक बिघाडच्डोंबिवली-सीएसटी अप धिमी लोकल मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास दिवा स्थानकातून पुढे निघाल्यानंतर, रुळाच्या सांध्याचा भाग निघाल्याचा जोराचा आवाज झाला. यामुळे ही लोकल १५ मिनिटे जागीच थांबली. त्यामुळे मोठा अपघात टळला. च्रेल्वेच्या कामगारांनी दुरुस्ती केल्यानंतर ही लोकल सीएसटीच्या दिशेने धावली. दरम्यान, दोन दिवसांमध्ये रुळांमध्ये बिघाड होण्याची ही तिसरी घटना असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.रुळाला तडा गेल्याने लोकला उशिरमध्य रेल्वेच्या आसनगाव-वासिंद दरम्यान अप मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेल्याने तब्बल एक तास वाहतूक ठप्प झाली. मंगळवारी सकाळी १०.५०च्या सुमारास एका रेल्वे कामगाराच्या वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. च्आसनगाव-वासिंद दरम्यान अप मार्गावर वेहळोली येथे अप मार्गावर रुळाला तडा गेल्याचे एका कामगाराच्या लक्षात आले. त्या पाठोपाठ वाराणसी-दादर एक्स्प्रेस आणि जनशताब्दी एक्स्प्रेस आसनगाव स्थानकात थांबविण्यात आल्या.