Join us

कारचा टायर फुटल्याने पामबीच मार्गावर अपघात

By admin | Updated: September 14, 2014 00:41 IST

पामबीच मार्गावर भरधाव कार उलटून विरुद्ध दिशेच्या मार्गावरील चार वाहनांना धडक दिल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.

नवी मुंबई :  पामबीच मार्गावर भरधाव कार उलटून विरुद्ध दिशेच्या मार्गावरील चार वाहनांना धडक दिल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर नेरूळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या  अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पामबीच मार्गावर नेरूळ जंक्शनलगत हा अपघात घडला. मिताली शहा (25) या सीबीडीकडून वाशीच्या दिशेने कारने (एमएच क्2 सीबी 3741) चालल्या होत्या.
भरधाव वेगात असताना नेरूळ सिग्नलपासून काहीसे अंतर पुढे आली असता कारचा मागचा टायर फुटला. त्यामुळे ही कार पलटी होऊन दुभाजक ओलांडत विरुद्ध दिशेच्या मार्गावर घुसली. यावेळी वाशीकडून नेरूळच्या दिशेने जाणा:या तीन कार व एका मोटरसायकलला  या कारची धडक बसली. या अपघातामध्ये चार जण जखमी झाले आहेत. संजय पवार, भास्कर पडवळ, जयाजू बानू व इतर एकाचा समावेश आहे. तर कार चालक मिताली शहा तसेच एक स्कुटी चालक महिलेला गंभीर दुखापत झाली.