Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाचशे, हजारद्वारे देयके भरण्याची सुविधा नागरी सुविधा केंद्रावरही

By admin | Updated: November 14, 2016 05:43 IST

महानगरपालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांतील नागरी सुविधा केंद्रांमध्ये जुन्या चलनातील पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारून विविध देयके

मुंबई : महानगरपालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांतील नागरी सुविधा केंद्रांमध्ये जुन्या चलनातील पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारून विविध देयके भरण्याची सुविधा १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत उपलब्ध आहे. करदात्यांना मालमत्ता कर, जल देयके व इतर करांची देयके अदा करताना, पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांचा भरणा करण्याची मुभा देण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशान्वये महापालिकेने मुंबईकरांसाठी ही सुविधा कार्यान्वित केली आहे. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीदेखील ही सुविधा उपलब्ध असून, करदात्यांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)