Join us
Daily Top 2Weekly Top 5

गडचिंचले परिसरात भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: May 28, 2014 00:05 IST

डहाणू तालुक्यातील अतिदुर्गम, डोंगराळ, आदिवासी भागात सध्या भीषण पाणीटंचाई सुरू असून गडचिंचले परिसरामध्ये ग्रामस्थ व गुरांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.

दापचरी : डहाणू तालुक्यातील अतिदुर्गम, डोंगराळ, आदिवासी भागात सध्या भीषण पाणीटंचाई सुरू असून गडचिंचले परिसरामध्ये ग्रामस्थ व गुरांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. गडचिंचले हे गाव महाराष्टÑ व दादरा नगर हवेली (केंद्रशासित प्रदेश) सीमारेषेवर आहे. पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत आटल्याने डोंगर व माळवात तुडवत पांडुण्याच्या नदीतील खडड््यात साचलेल्या पाण्यावरच तहान भागवावी लागते. दूषित पाण्याचे खड्डे उपसण्यासाठी कुटुंबकबिल्यासह जणू स्पर्धा लागल्याने चित्र दिसत आहे. माती आणि पाण्याचे एकत्रित मिश्रण वेगळे करण्यासाठी हंड्याला कपडा बांधला जातो. गुरेढोरे पाणी पीत असलेल्या याच झर्‍यातील गढूळ पाणी पिण्यापलीकडे येथील आदिवासी ग्रामस्थांवर पर्याय उरलेला नाही. या पाणीसंकटावर मात कशी करावी हा पाणीप्रश्न कसा सोडवावा असा प्रश्न राजेश भाऊ साठे व ग्रामस्थ करीत आहेत. (वार्ताहर)