Join us
Daily Top 2Weekly Top 5

बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास १८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून सुरुवात करण्यात झाली. अर्ज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :

राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून सुरुवात करण्यात झाली. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ४ जानेवारी होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्ज भरण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता हे अर्ज भरण्यास १८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे राज्य मंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डेटाबेसवरून ऑनलाइन पद्धतीने भरण्यास सुरुवात झाली. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे यासारख्या शहरांतील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये अद्याप सुरू झालेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता अर्ज भरण्यासाठी १८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आला आहे. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर महाविद्यालयामधील जनरल रजिस्टरशी माहिती पडताळून खात्री करून घ्यावी, त्यानंतरच अर्ज सादर करण्यात यावा, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे केले आहे.