Join us

गिरणी कामगारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 03:08 IST

एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील गृहनिर्माण योजनेद्वारे मौजे कोन (ता. पनवेल, जि. रायगड), येथील प्राप्त २ हजार ४१७ सदनिकांची म्हाडामार्फत संगणकीय लॉटरी २ डिसेंबर २०१६ रोजी काढण्यात आली.

मुंबई : एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील गृहनिर्माण योजनेद्वारे मौजे कोन (ता. पनवेल, जि. रायगड), येथील प्राप्त २ हजार ४१७ सदनिकांची म्हाडामार्फत संगणकीय लॉटरी २ डिसेंबर २०१६ रोजी काढण्यात आली. लॉटरीमध्ये यशस्वी ठरलेल्या गिरणी कामगार/वारस यांना कोटक महिंद्रा बँकेत कागदपत्रे सादर करण्यासाठी ४ आॅगस्टपर्यंत देण्यात आलेली मुदत २२ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉटरीमध्ये यशस्वी ठरलेल्या गिरणी कामगारांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. संबंधित गिरणी कामगारांना उपमुख्य अधिकारी (पूर्व), मुंबई मंडळ (म्हाडा), या कार्यालयामार्फत त्यांच्या अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर प्रथम सूचनापत्रे पाठविली. प्रथम सूचनापत्रानुसार यशस्वी ठरलेल्या गिरणी कामगारांना कोटक महिंद्रा बँकेत कागदपत्रे सादर करण्यासाठी ५ जुलै ते ४ आॅगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती.