Join us

दुसऱ्या यादीतील प्रवेशाला मुदतवाढ

By admin | Updated: July 9, 2016 02:15 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे दुसऱ्या यादीत नाव आलेल्या

मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे दुसऱ्या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना शनिवारीही महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे. दरम्यान, या मुदतवाढीमुळे अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी सोमवारऐवजी मंगळवारी जाहीर होणार आहे.सहायक शिक्षण संचालक राजेंद्र अहिरे यांनी सांगितले की, अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी सोमवारी, ४ जुलैला जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवारी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यास वेळ दिलेला होता.तर बुधवारी रमजान ईदनिमित्त महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. मात्र काही महाविद्यालयांत दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारनिमित्त सुट्ट्या देण्यात आल्या. परिणामी, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक दिवस कमी मिळाला होता. याची दखल घेत, उपसंचालक कार्यालयाने प्रवेशासाठी शनिवारी एक दिवस वाढीव दिलेला आहे. (प्रतिनिधी)