Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणीला मुदतवाढ

By admin | Updated: June 17, 2016 03:05 IST

मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१६-१७ साठी विविध विद्याशाखांच्या प्रवेशासाठी तेरावी प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणीचे संकेतस्थळ मंगळवारी पहिल्याच दिवशी क्रॅश झाले होते.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१६-१७ साठी विविध विद्याशाखांच्या प्रवेशासाठी तेरावी प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणीचे संकेतस्थळ मंगळवारी पहिल्याच दिवशी क्रॅश झाले होते. त्यानंतर, विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी अधिक वेळ मिळावा, म्हणून प्रशासनाने प्रवेशपूर्व नोंदणीस २५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा गुरुवारी केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी आणखी चार दिवस मिळणार आहेत.या आधी मंगळवारी सुरू झालेल्या प्रवेशपूर्व नोंदणीची मुदत २१ जून रोजी संपणार होती. तेरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेश नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी विद्यापीठाच्या संकेतस्थळात तांत्रिक बिघाड झाला. परिणामी, पहिल्याच दिवशी विद्यापीठाचे संकेतस्थळ क्रॅश झाल्याने, अनेक प्रवेशार्थी विद्यार्थ्यांना नोंदणीच करता आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली होती. अखेर विद्यापीठाने प्रवेश नोंदणीसाठी मुदत वाढवली असून, तेरावीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना २५ जूनपर्यंत प्रवेशपूर्व नोंदणी करता येणार आहे.तेरावी प्रवेशाचे प्रवेशपूर्व अर्ज २४ जूनपर्यंत उपलब्ध असतील, तर प्रवेश पूर्व आॅनलाइन नोंदणी अर्ज २५ जूनपर्यंत करता येईल. शिवाय, पूर्वनोंदणी अर्ज आणि कागदपत्रांची पूर्तता १८ जून ते २५ जून या कालावधीत करावी लागेल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)प्रवेशाचे वेळापत्रकपहिली गुणवत्ता यादी : २५ जून (सायं. ६ वाजता)कागदपत्र पडताळणी आणि शुल्क भरणी : २७ आणि २८ जून (सायं. ४ वाजेपर्यंत) दुसरी गुणवत्ता यादी : २९ जून (सायं. ६ वाजता)कागदपत्र पडताळणी आणि शुल्क भरणी : ३० जून आणि १ जुलै (सायं. ४ वाजेपर्यंत)तिसरी गुणवत्ता यादी : १ जुलै (सायं. ६ वाजता)कागदपत्र पडताळणी आणि शुल्क भरणी : २ आणि ४ जुलै (सायं. ४ वाजेपर्यंत)आतापर्यंत २ लाख ५९ हजार ३५५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला आहे, तर 1,31,826विद्यार्थ्यांनी आॅनलाइन नोंदणी केल्याचे मुंबई विद्यापीठ जनसंपर्क विभागाचे उपकुलसचिव लीलाधर बन्सोड यांनी सांगितले.अभाविपकडून निषेध : नोंदणीचे संकेतस्थळ बंद पडल्याने हजारो विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला होता. याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निषेध नोंदवला आहे. त्याचप्रमाणे, अर्जामध्ये बौद्ध धर्माचा उल्लेख नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.