Join us

आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 02:17 IST

शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या निर्देशानुसार आरटीई अंतर्गत बालकांना प्रवेश घेण्यासाठी १० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबई : शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या निर्देशानुसार आरटीई अंतर्गत बालकांना प्रवेश घेण्यासाठी १० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत ४ एप्रिल ही होती. बृहन्मुंबई महापालिका, शिक्षण विभाग शैक्षणिक वर्ष २०१८-१९करिता बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अंतर्गत पात्र खासगी विनाअनुदानित प्राथमिक शाळांतील (अल्पसंख्याक शाळा वगळून) प्रवेशाच्या सुरुवातीच्या वर्गात (एन्ट्रन लेव्हल) वंचित व दुर्बल घटकांतील बालकांसाठी राखीव प्रवेशाच्या २५ टक्के जागा आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या प्रणालीद्वारे भरण्यासाठी १३ मार्च रोजी पहिली सोडत काढण्यात आली होती. तथापि, शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या निर्देशानुसार १० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.