Join us

प्रधानमंत्री पीक विमा योजनेस २३ जुलैपर्यंत मुदतवाढ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:05 IST

मुंबई : राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून मिळावी, अशी ...

मुंबई : राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून मिळावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाने गुरुवारी केंद्र शासनाकडे पाठविल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची १५ जुलै शेवटची मुदत असून, आतापर्यंत सुमारे ४६ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. मात्र, राज्यातील काही भागात लांबलेला पाऊस, कोरोना प्रतिबंधासाठी असलेले निर्बंध यामुळे शेतकऱ्यांना मुदतीत विमा हप्ता भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता यावे यासाठी सर्व बाबींचा विचार करून केंद्र शासनाने २३ जुलैपर्यंत योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव गुरुवारी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठविला आहे.