Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘गील्बर्ट हिल’च्या जीवघेण्या बहुमजली घरांचे निष्कासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अंधेरी पश्चिम येथील गील्बर्ट हिल या डोंगराळ परिसरात बांधण्यात आलेल्या जीवघेण्या बहुमजली घरांवर पालिकेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अंधेरी पश्चिम येथील गील्बर्ट हिल या डोंगराळ परिसरात बांधण्यात आलेल्या जीवघेण्या बहुमजली घरांवर पालिकेच्या के/पश्चिम विभागाकडून तोडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. मुसळधार पाऊस किंवा वादळ वाऱ्यामुळे ही घरे पडून जीवितहानी होण्याची भीती असल्याने ही मोहीम हाती घेतल्याचे के/पश्चिम विभागाच्या सहायक आयुक्तांकडून सांगण्यात आले.

गील्बर्ट हिलच्या जनता कॉलनीमध्ये गेल्या आठवड्याभरापासून ही कारवाई के/पश्चिमच्या सहायक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागाने हाती घेतली आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ ऑगस्ट, २०२१ पासून ही कारवाई सुरू करत २४,२५,२६ आणि ३० ऑगस्ट, २०२१ पर्यंत पालिकेने अनधिकृतपणे बांधण्यात आलेली ग्राऊंड प्लस वन व ग्राऊंड प्लस थ्री अशी १२ बांधकामे अद्याप निष्काशित केली आहेत. ही घरे डोंगराळ भागात उतारावर धोकादायक पद्धतीने बांधल्याने पावसात ती पडून मोठी जीवितहानी होण्याची भीती होती. त्यानुसार त्यावर कारवाई करण्यात आली असून पुन्हा ३ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर, २०२१ पर्यंत कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

पालिकेची बदनामी होऊ नये

डोंगराळ भागातील जीवघेणी बांधकामे पडून जीवितहानी झाल्यावर निष्पाप बळी जातात. तसेच त्यामुळे पालिकेची नाहक बदनामी होते जी होऊ नये यासाठी त्यावर कारवाईची मोहीम आम्ही हाती घेतली असून झोपडपट्टीमधील अशी धोकादायक आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येणार आहे.

- पृथ्वीराज चव्हाण, सहायक आयुक्त, के/पश्चिम विभाग