Join us

फळांच्या राजाची निर्यात घटली

By admin | Updated: May 1, 2015 01:18 IST

खराब हवामानामुळे कोकणच्या आंबा उत्पादनावर परिणाम झाला असून त्यावर डाग पडले आहेत. याचा परिणाम निर्यातीवरही होऊ लागला आहे.

नामदेव मोरे - नवी मुंबईखराब हवामानामुळे कोकणच्या आंबा उत्पादनावर परिणाम झाला असून त्यावर डाग पडले आहेत. याचा परिणाम निर्यातीवरही होऊ लागला आहे. दरवर्षीपेक्षा ५० टक्के निर्यात कमी होण्याची भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. कोकणातील हापूस आंब्याला जगभरातून मोठी मागणी असते. त्याचप्रमाणे गुजरात, कर्नाटक व इतर राज्यातील आंब्यांचीही निर्यात होत असते. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने अपेडाच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. युरोपीयन देशांनी लादलेली बंदीही प्रयत्न करून उठविली आहे. परंतु अवकाळी पाऊस व खराब हवामानामुळे आंब्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. आंब्यावर काळे डाग पडले आहेत. यामुळे निर्यातीसाठी पुरेसा आंबा उपलब्ध होत नाही. देशातून तीन प्रकारचा आंबा निर्यात होतो. ४००, ६०० व ९०० ग्रॅम वजनाच्या आंब्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते. निर्यात होणारा आंबा रायपनिंग चेंबरमध्ये पिकविण्यात येतो. भाजी मार्केटमधील निर्जंतुकीकरण केंद्रामध्ये (व्हीएचटी केंद्र) योग्य प्रक्रिया करून तो निर्यात केला जातो. निर्यात गतवर्षीपेक्षा ५० टक्के कमी आहे. चांगल्या दर्जाचा आंबा ४०० ते ९०० रुपये डझन दराने निर्यात होत आहे. गतवर्षी ४१ हजार २८० क्विंटल आंब्याची निर्यात झाली होती. मुंबईसह इतर ठिकाणांवरून आंबा निर्यात केला जात आहे. निर्यातीचा टक्का किती घसरला याचे चित्र आंब्याच्या हंगामाच्या शेवटी स्पष्ट होईल.निर्जंतुकीकरणाची सुविधागतवर्षी युरोपीयन देशांनी आंब्यावर बंदी घातली होती. यावर्षी बंदी उठविली आहे. युरोपीयन देशांमध्ये आंबा पाठविण्यापूर्वी निर्जंतुकीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भाजीपाला मार्केटमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून तेथील केंद्रात निर्जंतुकीकरण करून माल निर्यात केला जात आहे. आंबा पिकविण्यासाठीही रायपनिंग चेंबरचा वापर करण्यात येत आहे.यावर्षी आंबा निर्यातीसाठी प्रशासकीय अडचणी काहीही नाहीत. युरोपीयन देशांमध्येही व्यापार सुरू आहे. आखाती देशात प्रतिवर्षीप्रमाणे सर्वाधिक निर्यात होत आहे. परंतु यावर्षी उत्पादनच कमी असल्यामुळे निर्यातीवरही परिणाम झाला आहे.- मोहन डोंगरे,आंबा निर्यातदार