मुंबई : वीजगळती कमी करण्याच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेल्या वीजचोरी मोहिमेंतर्गत महावितरणने मुलुंड पश्चिमेकडील सात लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे.मुलुंडमधल्या कलासागर येथील किशोर ठक्कर या वीज ग्राहकाने तब्बल ७८ हजार ७६४ वीज युनिटची चोरी केल्याचे निदर्शनास आले आहे. थ्री फेज कनेक्शन असलेल्या मीटरचे दोन फेज हे बसबारमधून डायरेक्ट फ्युज युनिटला जोडल्याचे आढळले. त्यामुळे दोन फेजचे युनिट रेकॉर्डिंग होत नसल्याचे निदर्शनास आले. ही वीजचोरी लक्षात आल्यानंतर मीटर ताब्यात घेत मागील दोन वर्षांचे ७८ हजार ७६४ युनिट गृहीत धरून ७ लाख ८४ हजार ५६० रुपयांचे वीज बिल ग्राहकाला देण्यात आले आहे. ग्राहकाने ३ जुलै रोजी संपूर्ण रकमेचा भरणा केला असून, दंड म्हणून आकारण्यात आलेले ९५ हजार रुपये तत्काळ अदा केले आहेत. (प्रतिनिधी)
मुलुंड येथे सात लाखांची वीजचोरी उघड
By admin | Updated: July 5, 2015 03:31 IST