Join us
Daily Top 2Weekly Top 5

कांदिवली गोळीबारातील लुटारूंचा तपशील उघड

By admin | Updated: November 19, 2015 03:58 IST

कांदिवलीमध्ये गेल्या आठवड्यात पैशांची बॅग हिसकावण्याच्या प्रयत्नात दक्षेश शाह (४१) या व्यापाऱ्यावर गोळीबार करणारे हल्लेखोर कोणत्याही टोळीशी संबंधित नसल्याचा

मुंबई : कांदिवलीमध्ये गेल्या आठवड्यात पैशांची बॅग हिसकावण्याच्या प्रयत्नात दक्षेश शाह (४१) या व्यापाऱ्यावर गोळीबार करणारे हल्लेखोर कोणत्याही टोळीशी संबंधित नसल्याचा पोलिसांचा दावा आहे. तसेच हे भुरटे ज्या ठिकाणाहून पसार झाले त्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्याने तपासाला गती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.कांदिवलीत गोळीबारप्रकरणी अद्याप करण्यात आलेल्या तपासात हल्लेखोर हे कोणत्याही टोळीशी संबंधित नसल्याचे समोर येत आहे. तसेच शाह यांनी मालाडमध्ये अंगडियाकडे २९ लाख रुपये जमा केले. त्यानंतर बॅगेमध्ये २५ हजार रुपये घेऊन ते निघाले. त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. त्यामुळे शाह यांच्याकडे मोठी रक्कम असावी, जी लुबाडण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला, असा पोलिसांचा अंदाज आहे. हे हल्लेखोर मालाडपासूनच शाह यांचा पाठलाग करीत आल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सापडले होते. मात्र या हल्ल्यानंतर ते ज्या दिशेने पसार झाले, त्या दिंडोशी परिसरातीलही फुटेज मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यानुसार आता या तपासाला गती मिळून लवकरच हे हल्लेखोर पोलिसांच्या तावडीत सापडतील, अशी आशा असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)