Join us  

एचआयव्ही रुग्णांच्या आयुर्मानात वाढ, तज्ज्ञांचे निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 1:09 AM

एआरटी उपचार पद्धतीमुळे रुग्णांचे आयुर्मान जवळपास २० वर्षांनी वाढत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

- स्नेहा मोरेमुंबई : एचआयव्हीवरील एआरटी उपचार पद्धतीमुळे राज्यातील एचआयव्ही बाधित रुग्णांच्या आयुर्मानात वाढ होत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी मांडले आहे. सध्या राज्यात २,१५,८२५ एचआयव्ही बाधित रुग्ण आहेत, त्यातील ४८,९८७ रुग्णांवर अँटी रेट्रोव्हायरल थेरपी सुरू आहे. यात मुंबईतील ३८ हजार ८०६ रुग्णांचा समावेश आहे. या एआरटी उपचार पद्धतीमुळे रुग्णांचे आयुर्मान जवळपास २० वर्षांनी वाढत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे.राज्यात राष्ट्रीय एड्स नियंत्रण सोसायटी व मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीच्या सहकार्याने ‘एचआयव्ही’चे प्रमाण घटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याअंतर्गत एचआयव्हीबाधीत व्यक्तींवर अँटी रेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी)द्वारे उपचार केले जातात. यामुळे एचआयव्ही संसर्ग कमी करता येतो, प्रतिकारशक्ती वाढते, आजाराची वाढ खुंटते, परिणामी, रुग्णांचे आयुर्मान वाढते.मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीच्या प्रकल्प संचालिका डॉ. श्रीकला आचार्य यांनी सांगितले की, २००४ साली एचआयव्ही संसर्गावर एआरटी उपचारसेवा सुरू झाली. त्यामुळे समुपदेशन, चाचणी कामाला खूपच पुष्टी मिळाली. यातून सकारात्मक चित्र दिसत आहे. एआरटीचे हे औषध योग्य वेळी घेतले, तर व्हायरसची वाढ होण्याची प्रक्रिया थांबते. अँटी रेट्रोव्हायरल थेरपी योग्य पद्धतीने घेणे हा उपचाराचा महत्त्वाचा भाग आहे. डॉक्टरांना किंवा एआरटी केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे औषधे घ्यावी लागतात. त्यामध्ये जराही बदल झाला किंवा अनियमितता असल्यास एचआयव्ही संसर्गाला हे औषध दाद देत नाही किंवा औषधाचा परिणाम होत नाही अथवा कमी होतो.महागडी तपासणी मोफत‘ट्रीट आॅल’ पॉलिसीनुसार एचआयव्ही संसर्गितांवर लगचेच औषधोपचार सुरू करण्यात येतात. रुग्णांच्या पांढºया पेशींचे प्रमाण जाणून घेण्यासाठी केली जाणारी सीडीफोर ही महागडी तपासणी एआरटी केंद्रात मोफत केली जाते व औषधोपचार सुरू होतात. संपूर्ण आयुष्यभर घ्याव्या लागणाºया एआरटी औषधांमुळे रुग्णांचे आयुर्मान वाढण्यास मदत होते.एचआयव्ही जगणाºया व्यक्तींपर्यंत एआरटीची माहिती पोहोचविणे, उपचारसेवेचा लाभ अधिकाधिक लोकांना मिळावा, या दृष्टीने एआरटी केंद्र कार्यरत आहेत. काही वर्षांपूर्वी एचआयव्ही संसर्ग झाला, म्हणजे आयुष्य संपले अशी संज्ञा होती. मात्र, २००४ पासून सुरू झालेल्या एआरटी उपचार पद्धतीमुळे रुग्णांचे आयुर्मान जवळपास २० वर्षांनी वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.- डॉ. श्रीकला आचार्य, प्रकल्प संचालिका, मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटी.

टॅग्स :एड्स