Join us

रामदास आठवलेंना आणखी एक 'लॉटरी'; आशीष शेलारांनाही 'बढती'?

By अतुल कुलकर्णी | Updated: June 14, 2019 11:17 IST

हिरवा कंदील मिळेना : मुख्यमंत्री शनिवारी दिल्लीत जाणार

अतुल कुलकर्णी 

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अनेक वावड्या उठत असल्या तरी विस्तार अथवा फरबदलास भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी अद्याप परवानगी दिलेली नाही. मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस शनिवारी दिल्लीत जात असून पक्षाध्यक्ष अमित शहा तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ते भेट घेणार आहेत. शहा यांनी विस्ताराला हिरवा कंदील दाखवला तर रविवारी विस्तार होऊ शकेल.

सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी विस्तार होईल, असे मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केले होते. यावरून पतंगबाजी सुरू आहे. राधाकृष्ण विखे यांना मंत्रीपद देण्यास भाजपमधील निष्ठावंतांचा विरोध असल्याची चर्चा आहे. मात्र, विखे व मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे मंत्रीपद निश्चित असल्याचे समजते. अनिल बोंडे व संजय कुटे यांच्यापैकी एक, तर शिवाजीराव नाईक व अतुल सावे यांच्यापैकी एक अशा दोघांना संधी मिळू शकते. रामदास आठवले यांच्या रिपाइंला एक मंत्रीपद मिळू शकेल.शिवसेनेतही राजकीय रस्सीखेच सुरू एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद हवे आहे. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त करून, शिंदे यांनी काही आमदारांसह मातोश्रीवर शक्तिप्रदर्शन केले. शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास रामदास कदम, सुभाष देसाई व दिवाकर रावते यांचा विरोध असल्याचे समजते. त्यामुळे शिवसेना उपमुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरण्याची शक्यता कमी आहे.शिवसेनेला दोन मंत्रीपदे शिवसेनेच्या कोट्यातील एक मंत्रीपद रिकामे असून राष्टÑवादीतून सेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांना ते मिळू शकते. दोन मंत्रीपदे मिळावीत असा सेनेचा आग्रह आहे.

आदित्यच नेतृत्व करतील - राऊतआदित्य ठाकरे राज्याचे नेतृत्व करण्यास समर्थ आहेत. त्यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह आहे, असे खा. संजय राऊत म्हणाले. मनोहर जोशी म्हणाले, शिवसेनेचे जास्त आमदार आले तर मुख्यमंत्रीपदाचे आदित्य उमेदवार असतील. या विधानांमुळे भाजप नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.भाजप प्रदेशाध्यक्षपदाची चर्चा हवेमध्येचरावसाहेब दानवे केंद्रात मंत्री झाल्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे; पण त्यांनी नकार दिला आहे. पक्षाच्या राष्टÑीय अध्यक्षपदाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड होण्याची शक्यता नाही.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमंत्रीमुंबई