Join us
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेच्या गणपती उत्सव विशेष गाड्यांचा विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:06 IST

मुंबईमध्य रेल्वेने गणपती विशेष गाड्यांचा विशेष शुल्कासह विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. ...

मुंबई

मध्य रेल्वेने गणपती विशेष गाड्यांचा विशेष शुल्कासह विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या विशेष गाड्यांच्या विस्तारित सेवांसाठी विशेष शुल्कावर बुकिंग १२ सप्टेंबरपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या संकेतस्थळावर सुरू झाली आहे. विशेष गाड्यांचे थांबे आणि वेळेत कोणताही बदल झालेला नाही.

पनवेल - चिपळूण विशेष गाडी १५ सप्टेंबरपर्यंत धावणारी आता २० सप्टेंबरपर्यंत धावणार आहे.

चिपळूण - पनवेल विशेष गाडी १५ सप्टेंबरपर्यंत धावणारी आता २० सप्टेंबरपर्यंत धावणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस - सावंतवाडी रोड विशेष गाडी १४ सप्टेंबरपर्यंत धावणारी आता १६ सप्टेंबरपर्यंत (एक सेवा) वाढवण्यात आली आहे.

सावंतवाडी रोड - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी १५ सप्टेंबरपर्यंत धावणारी आता १७ सप्टेंबरपर्यंत (एक सेवा) धावणार आहे.

पनवेल - सावंतवाडी रोड विशेष गाडी १५ सप्टेंबरपर्यंत धावणारी आता १७ सप्टेंबरपर्यंत (एक सेवा) धावणार आहे.

सावंतवाडी रोड - पनवेल विशेष गाडी १४ सप्टेंबरपर्यंत धावणारी आता १६ सप्टेंबरपर्यंत (एक सेवा) धावणार आहे.