Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘वाचाल तर वाचाल’ उपक्रमाला चालना

By admin | Updated: September 4, 2014 23:29 IST

2 ते 9 सप्टेंबर दरम्यान आयोजित पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच सुयोग मंगल कार्यालय येथे ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञ डॉ. विश्वास मेहंदळे यांच्या हस्ते झाले .

डोंबिवली : टिळक नगर सार्वजनिक गणोशोत्सव मंडळातर्फे फ्रेंड्स लायब्ररीच्या पुंडलिक पै यांच्या सहयोगाने समाज प्रबोधनाच्या उद्देशाने तसेच ‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणो वाचन संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने  2 ते 9 सप्टेंबर दरम्यान आयोजित पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच सुयोग मंगल कार्यालय येथे ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञ डॉ. विश्वास मेहंदळे यांच्या हस्ते झाले . 
त्यावेळी ते म्हणाले की, नवयुवकांनी वाचन करणो जरुरीचे आहे. रामायण व महाभारत टीव्हीवर बघण्याऐवजी पुस्तकरुपात वाचले, तर ते कायमस्वरूपी स्मरणात  राहील. दूरचित्रवाणी आणि इतर माध्यमांनी आबालवृद्धांची वाचनाची आवड कमी केली आहे. या वेळी उपस्थित पालकांना उद्देशून ते म्हणाले की, लहान मुलांचे अवाजवी हट्ट सध्या पालक पुरवतात. त्यामुळे मुलांना नाही ऐकण्याची सवय राहत नाही. परिणामी रिंकू पाटीलसारखी लाजिरवाणी घटना घडते. मुलांचे आदर्श वाचनाच्या अभावामुळे चुकीचे होतात आणि त्यातूनच अशा घटना वारंवार उद्भवतात, असेही ते म्हणाले.
डोंबिवलीतील नागरिकांबाबत गौरवोद्गार काढताना ते म्हणाले, डोंबिवली ही नवर}ांची खाण आहे. राष्ट्राच्या उभारणीत येथील व्यक्तिमत्त्वांनी आजपयर्ंत योगदान दिले असून यापुढेही योगदान देत राहतील. प्रकाशनाच्याटप्प्यावर असलेल्या त्यांच्या ‘सरसंघचालक ’ या पुस्तकाबद्दल बोलताना ते म्हणाले की, आत्तापयर्ंतचे सर्व सरसंघचालक हे उच्च विद्याविभूषित आहेत. त्यानी आपापल्या विषयात सुवर्णपदक पटकाविले आहे.  एका विशिष्ट विचारधारेसाठी त्यांनी आपले आयुष्य खर्च केले आहे, मात्र तरीही त्यांचा विचार कधीच ‘भारतर}’सारख्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी केला जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.  मंडळाचे प्रसिद्धीप्रमुख संदीप वैद्य यांनी नागरिकांना या पुस्तक प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन केले.