Join us
Daily Top 2Weekly Top 5

जादा कामांच्या ओझ्यातून जवानांची सुटका

By admin | Updated: June 3, 2015 04:10 IST

काळबादेवी येथील आगीत चार महत्वाचे अधिकारी गमावल्यानंतर खडबडून जाग आलेल्या पालिकेने अग्निशमन दलाच्या सक्षमीकरणाची तयारी सुरु केली आहे़

मुंबई: काळबादेवी येथील आगीत चार महत्वाचे अधिकारी गमावल्यानंतर खडबडून जाग आलेल्या पालिकेने अग्निशमन दलाच्या सक्षमीकरणाची तयारी सुरु केली आहे़ त्यानुसार आगीतील बचावकार्याव्यतिरिक्त अतिरिक्त कामाच्या ताणातून जवानांची सुटका करण्यात येणार आहे़ तसेच नवीन इमारतींना अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे़ शिफारशींची अंमलबजावणी तात्काळआगीचे अनेक चौकशी अहवाल व शिफारशी प्रकाशित झाल्यानंतर त्याच्यावर कधीच अंमलबजावणी होताना दिसत नाही़ मात्र यावेळीस या चौकशी अहवालातील शिफारशीनुसार अग्निशमन दलामध्ये अपेक्षित सुधारणा करण्याची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे़ त्यानुसार केलेल्या कार्यवाहीचा अहवाल प्रत्येक आठवड्याला देशमुख आयुक्तांकडे सादर करणार आहेत़