नवी मुंबई : नारळी पौर्णिमेच्या सणाला..नारळ वाहूया दर्याला..नारळ वाहूनी दर्याला..आळवू या विधात्याला असे म्हणत शहरात ठिकठिकाणी नारळी पौर्णिमाचा सण उत्साहात साजरा झाला. समुद्रकिना-यांवर नारळी पौणिमेनिमित्त गर्दी झाली होती तर रक्षाबंधनाचा उत्साह शहरात सर्वत्र पहायला मिळाला. पारंपरिक वेशभुषा आणि समुद्राची गाणी म्हणत सर्वत्र उत्साहात नारळीपौर्णिमेचा सण सर्वत्र उत्साहात साजरा झाला. नवी मुंबईतील पामबीच खाडी, वाशी खाडी पुलाजवळील खोल समुद्रात दिवाळे कोळईवाडा, सारसोळे गाव, करावे, बोनकोडे कोळीवाडा, ऐरोलीतील दिवा कोळीवाडा अशा सर्वच कोळी बांधवांनी सागराला नारळ अर्पण केला. यावेळी चांगले मासे मिळू दे आणि मासेमारी करताना मच्छामारांवर कोणतेही संकट येऊ नये अशी प्रार्थना करण्यात आली. दिवाळे कोळीवाडा येथे सिध्दी मित्र मंडळातर्फे भव्य नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला होता. यामध्ये लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वच वयोगटातील कोळी बांधव या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हनुमान मंदिर ते गावदेवी मंदिरापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन केले होते. यामध्ये कोळी गीते आणि नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. बोनकोडे गाव ते वाशी खाडी पर्यंत पालखी मिरवणुकीचे आयोजन केले होते.परिचारिकांनी बांधल्या रुग्णांना राख्यारक्षाबंधनानिमित्त गेले काही दिवस बाजारात विविध प्रकारच्या राख्यांची जोरदार विक्र्री सुरु होती. शनिवारीही महिलांनी राख्या खेरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी केली होती. नातेवाईक, शेजारी, मित्रपरिवारांमध्ये राखीपौर्णिमा साजरी करण्यात आली. भारतीय अग्नीशिखा मंचाच्या महिलांनी वाशीतील एपीएमसी येथील पोलिसांना राख्या बांधून अनोख्या पध्दतीने रक्षाबंधनाचा सण साजरा केला. नेरुळ येथील डी.वाय. पाटील रुग्णालयाच्या परिचारींकांनी रुग्णांचा राखी बांधून सर्व रुग्णांना चांगले आरोग्य लाभावे यासाठी मनोभावे प्रार्थना केली. आजारपणामुळे अंथरुणाला खिळून बसलेल्या रुग्णांच्या हातात राखी बांधून लवकर बरे होण्यासाठी परिचारीकांनी केलेल्या प्रार्थनेतून माणुसकीचे दर्शन घडले. शहरातील सर्वच शाळाना रक्षाबंधन सणानिमित्त असलेल्या सुट्टीमुळे एक दिवस आधीच रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला होता. शाळेतील विद्यार्थीनींनी वर्गातील विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या तर या सर्वच विद्यार्थ्यांनी सर्वच मुलींना भेटवस्तू दिल्या. विद्यार्थिनीचे अनोखे रक्षाबंधननवीन पनवेल येथील चांगु काना ठाकूर विद्यालयातील मुलीनी वाहतूक शाखेच्या पोलिसांना राख्या बांधून अनोखी रक्षाबंधन साजरे केले.सण असला की वाहतूक पोलिसांना आपल्या नातेवाईकांना भेटता येत नाही. तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी सुट्टी नसल्यामुळे बहिणीला भेटायला जाता येत नाही. त्यामुळे नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जवळपास २० वाहतूक पोलिसांच्या हाताला राखी बांधली. यावेळी विना हेल्मेट प्रवास करणार्या दुचाकीस्वारांना थांबवून त्यांच्या हाताला राखी बांधून त्यांना हेल्मेट वापरण्याचा सल्ला अनोखा संदेश देण्यात आला.
नारळीपौर्णिमेनिमित्त शहरात उत्साह
By admin | Updated: August 29, 2015 22:20 IST