Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

By admin | Updated: June 17, 2014 01:12 IST

उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर आज शाळा पुन्हा सुरू झाल्या. शाळांचा परिसर आज सकाळपासूनच गजबजून गेला होता

नवी मुंबई : उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर आज शाळा पुन्हा सुरू झाल्या. शाळांचा परिसर आज सकाळपासूनच गजबजून गेला होता. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता. शाळांच्या बाहेर पालकांनीही मोठी गर्दी केली होती. नवी मुंबईची शिक्षण नगरी म्हणून ओळख निर्माण झाली आहे. दोन सत्रात शाळा सुरू असल्यामुळे सर्व विभागांत शाळांचा परिसर गजबजून जात असतो. उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शांत असलेला शाळा परिसरात आज पुन्हा उत्साहाचे वातावरण होते. अनेक महत्त्वाच्या शाळांमध्ये स्कूलबसमधून विद्यार्थी येत असतात. परंतु आज पहिला दिवस असल्यामुळे पालक स्वत: मुलांना शाळेत सोडण्यासाठी आल्याचे चित्र आज दिसत होते. अनेक शाळांमध्ये शाळा व्यवस्थापनाने मुलांचे स्वागत केले. (प्रतिनिधी)