Join us
Daily Top 2Weekly Top 5

मर्यादेपेक्षा जास्त पेनकिलर्स औषधांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:05 IST

मुंबई : वेदनेपासून त्वरित आराम मिळवा यासाठी प्रिस्क्रिप्शनशिवाय पेनकिलर्स औषधे घेतली जातात. परंतु औषधांच्या अतिवापरामुळे पोटात अल्सर होत आहेत ...

मुंबई : वेदनेपासून त्वरित आराम मिळवा यासाठी प्रिस्क्रिप्शनशिवाय पेनकिलर्स औषधे घेतली जातात. परंतु औषधांच्या अतिवापरामुळे पोटात अल्सर होत आहेत जे पोटासाठी दीर्घकाळ हानिकारक ठरू शकतात, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

फिजीशियन डॉ. तेहसीन पेटीवाला म्हणाले की, स्टमक अल्सर्स पोटातील अस्तरांमध्ये ब्रेक्स असतात. लहान ब्रेक्सला इरोशन्स म्हणतात आणि मोठ्याला अल्सर म्हणतात. पेप्टिक अल्सर व्याधींमध्ये पोट आणि ड्युओडेनममध्ये उपस्थित अल्सर्सचा समावेश असतो. एस्पिरिनचा समावेश असलेले पेन किलर्समुळे पोटातील अस्तरातील एक जिवाणू संसर्ग होऊन ॲसिडचे वाढीव उत्पादन होते आणि परिणामी पीयूडी होते. छिद्र पाडण्याच्या गंभीर प्रकरणांमुळे सर्जिकल ट्रिटमेंट करावी लागू शकते आणि वेळेवर व्यवस्थापन न झाल्यास मृत्यू होऊ शकतो. कधीकधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या अल्सरच्या बरे होण्यामुळे जीआय ट्रॅक्ट संकुचित होऊ शकतो ज्यामुळे अन्नपदार्थाच्या पुढे जाण्यात अडचण निर्माण होते ज्यामुळे उलट्या आणि ओटीपोटात तीव्र वेदना होतात.

एकूणच दीर्घकाळात, उपचार न केलेल्या अल्सर्समुळे शरीरावर परिणाम होतो ज्यामुळे अन्न खाण्याचा प्रमाण कमी होतो, त्यानंतर वजन कमी होते, ॲनेमिया होतो आणि एकूणच मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. शिवाय, वरील कॉम्प्लिकेशन होण्याचा धोका पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणि मृत्यूसाठी धोका आहे.

ग्लोबल हॉस्पिटलचे सीनियर कन्सल्टंट हेपॅटोलॉजिस्ट डॉ. आकाश शुक्ला म्हणाले, लिव्हर आजार असणाऱ्या आजार किंवा अल्कोहोलचा सेवन करणाऱ्या ॲसिम्पटोमॅटिक व्यक्तींमध्ये लिव्हर फेलियर होण्याची अधिक शक्यता असते. आयब्युफेनॅकसारख्या कित्येक पेन किलर्स बाजारातून काढून घेण्यात आले आहेत, कारण यामुळे विशेषत: मुलांमध्ये लिव्हर इंज्युरी होते. अनेक देशांमध्ये निमेस्युलाईडवर विशेषत: मुलांमध्ये लिव्हर फेलियर होण्याच्या वाढत्या धोक्यामुळे बंदी आहे.