Join us

उत्कृष्ट विधिमंडळ सदस्य पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 05:23 IST

महाराष्ट्र विधान मंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे देण्यात येणाऱ्या विधान परिषद अणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहांतील २०१५ ते २०१८ या कालावधीतील उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण अशा दोन्ही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

मुंबई : महाराष्ट्र विधान मंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे देण्यात येणाऱ्या विधान परिषद अणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहांतील २०१५ ते २०१८ या कालावधीतील उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण अशा दोन्ही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, महाराष्ट्र विधान मंडळाचे सचिवालयाचे प्रधान सचिव आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेचे पदसिद्ध सचिव डॉ. अनंत कळसे आणि ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांच्या निवड समितीने ही निवड केली आहे.>विधानसभा वर्ष उत्कृष्ट संसदपटू उत्कृष्ट भाषण२०१५-१६ डॉ. अनिल बोंडे प्र्रा. वर्षा गायकवाड२०१६-१७ सुभाष साबणे राजेश टोपे२०१७-१८ राहुल कुल धैर्यशील पाटीलविधान परिषद २०१५-१६ अ‍ॅड.अनिल परब राहुल नार्वेकर२०१६-१७ भाई गिरकर कपिल पाटील२०१७-१८ संजय दत्त प्रवीण दरेकर