Join us  

पुणे-कोकणवासीयांचा ‘उत्कृष्ट’ प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 2:05 AM

दख्खनची राणी (डेक्कन क्वीन) आणि डबलडेकरमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अपुरी प्रकाशयोजना, दुर्गंधी अशा गैरसोयींपासून लवकरच मुक्ती मिळणार आहे. रेल्वे बोर्डाने प्रकल्प ‘उत्कृष्ट’अंतर्गत मध्य रेल्वेला दख्खनची राणी व डबलडेकर एक्स्प्रेसच्या अंतर्गत रचनेच्या अपग्रेडेशनला मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देरेल्वे बोर्डाचा प्रकल्प : बोगीतील अंतर्गत रचनेचा होणार कायापालट

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दख्खनची राणी (डेक्कन क्वीन) आणि डबलडेकरमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अपुरी प्रकाशयोजना, दुर्गंधी अशा गैरसोयींपासून लवकरच मुक्ती मिळणार आहे. रेल्वे बोर्डाने प्रकल्प ‘उत्कृष्ट’अंतर्गत मध्य रेल्वेला दख्खनची राणी व डबलडेकर एक्स्प्रेसच्या अंतर्गत रचनेच्या अपग्रेडेशनला मंजुरी दिली आहे. या बोगीच्या उन्नतीकरणासाठी प्रत्येकी १६ लाख रुपये खर्च येणार आहे.

उन्नतीकरणानंतर प्रवाशांना उत्कृष्ट प्रवासी सुविधांचा अनुभव घेता येईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे प्रभारी विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस.के. पंकज यांनी शुक्रवारी दिली. प्रकल्प उत्कृष्टनुसार मध्य रेल्वेतील मेल-एक्स्प्रेस बोगीतील अंतर्गत रचनेचा कायापालट करण्यात येणार आहे. एकूण सहा एक्स्प्रेसच्या बोगींचे उन्नतीकरण करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात मुंबई-पुणे दख्खनची राणी व एलटीटी-मडगाव डबलडेकर एक्स्प्रेसचा समावेश आहे. उन्नतीकरणानुसार बोगीतील आसन व्यवस्था अधिक आरामदायी करण्यात येतील. त्याचबरोबर एलईडी प्रकाशयोजना, प्रत्येक बोगीत अग्निशमन यंत्रणा, बॅग ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था, जीपीएस यंत्रणा आणि अत्याधुनिक शौचालय या प्रवासी सुविधांचादेखील समावेश आहे. बोगी उन्नतीकरणानंतर १५ आॅगस्टच्या मुहूर्तावर दख्खनची राणी व दिवाळीच्या मुहूर्तावर डबलडेकर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

मेल-एक्स्प्रेसमधील सुविधांच्या उन्नतीकरणासाठी प्रकल्प ‘उत्कृष्ट’चा आराखडा तयार करण्यात आला. अर्थसंकल्पात त्यासाठी खर्चाची देखील तरतूद करण्यात आली आहे.

 

या एक्स्प्रेस बोगींचे होणार उन्नतीकरण

दख्खनची राणी आणि डबलडेकर एक्स्प्रेसनंतर दुसºया टप्प्यात सिद्धेश्वर एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, मुंबई-अमरावती एक्स्प्रेस आणि दुरांतो एक्स्प्रेस बोगींचा कायापालट करण्यात येईल, अशी माहिती एस.के. पंकज यांनी दिली.

टॅग्स :भारतीय रेल्वे