Join us  

परीक्षा रद्द, मात्र परीक्षा साहित्याची जबाबदारी मोठी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 7:02 AM

 मुख्याध्यापकांवर ताण,  सांभाळावे लागणार साहित्य

 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : संचारबंदीमुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत, बोर्डाच्या परीक्षा सोडून पहिली ते अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा न देता पुढच्या वर्गात पाठविण्यात आले आहे तरी शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या डोक्यावरील ओझे काही कमी होण्याचे नाव घेईना...! दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे तर बारावीची परीक्षा होणार सल्याचे स्पष्ट करण्यात आपले आहे. मात्र, या दरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाने परीक्षेचे साहित्य यापूर्वीच शाळांकडे सोपविल्यामुळे ते सांभाळून ठेवण्याची जबाबदारी शाळांवर येऊन पडली आहे. मात्र, शाळा बंद असल्यामुळे मुख्याध्यापकांचा ताप आणखीच वाढला आहे. .दहावीची २३ तर १२ वीची परीक्षा २९ एप्रिलपासून घेण्यात येणार होती. यासाठी परीक्षा मंडळाने शाळांकडे नियोजित वेळापत्रानुसार कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्राॅप्ट, स्टीकर सिटिंग प्लॅन, ए, बी. लिस्ट, विषयनिहाय., माध्यमनिहाय बारकोड, प्रात्याक्षिक परीक्षेचे साहित्य आदींचा पुरवठा केला आहे. मात्र, कोरोनाचे संकट वाढल्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, पुढील तारखा अद्यापही निश्चित करण्यात आल्या नाहीत. परिणामी शाळांना पुरविण्यात आलेले साहित्य सद्य:स्थितीत शाळांकडेच आहे. हे साहित्य संभाळणे ही मोठी जबाबदारी असल्यामुळे  शाळांतील  मुख्याध्यापकांचा ताप वाढला आहे. मुंबई विभागातील अनेक शाळांकडे सध्या साहित्य पोहोचले नाही तर बऱ्याच शाळा ज्यांच्याकडे साहित्य पोहचले आहे त्यांच्यावरील जबाबदारी वाढल्याने त्यांना स्वतःलाच शाळांत गस्त घालण्याची वेळ आली आहे. संचारबंदीमुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या असल्या तरी या जबाबदारीसाठी आणि शिवाय शैक्षणिक मूल्यमापनाच्या जबाबदारीसाठी मुख्याध्यापकांना, शिक्षकांना शाळेत अळीपाळीने का होईना बोलवावे लागत असल्याची माहिती मुख्याध्यापक देत आहेत.कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशा वेळी शाळेत जाणेही मुख्याध्यापक, शिक्षकांना कठीण झाले आहे.

परीक्षा कधी?दहावी बारावीच्या लेखी ऑफलाईन परीक्षा पुढे ढकलून बारावीच्या परीक्षा मे च्या शेवटच्या आठवड्यात आणि दहावीच्या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचा विचार होता मात्र आता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता दहावीच्या साहित्यासंदर्भात जो निर्णय येईल तोपर्यंत शाळांना ते साहित्य जपावे लागणार असून नंतर सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी लागणार आहे. बारावीच्या परीक्षाच झाल्या नसल्याने आता परीक्षा कधी होणार, निकाल कधी लागणार, त्यानंतर पुढील वर्गातील प्रवेश याबाबत सध्यातरी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

या वस्तू कस्टडीतकोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्राॅप, स्टीकर, सिटिंग प्लॅन, ए, बी लिस्ट, विषयनिहाय, माध्यमिक बारकोड, प्रात्याक्षिक परीक्षेचे साहित्य आदी.

मुख्याध्यापक म्हणतात....कोरोना संकटामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असले तरी मंडळाकडून आलेले साहित्य शाळांमध्ये जमा आहे त्यामुळे साहित्याची जबाबदारी शाळांवर आहे  संचारबंदीमुळे शाळा बंद आहे. साहित्य जपून असले तरी जिल्ह्यातील सर्वच मुख्याध्यापकांचा ताण बराच वाढला आहे. शिक्षण मंडळाला प्रत्येक साहित्याची माहिती ही साहित्य आल्यावर आणि परीक्षा झाल्यावर ही द्यावी लागत असल्याने निश्चितच हे काम काळजीपूर्वक आणि जबाबदारीने करावे लागते.- माणिक दोतोंडे , मुख्याध्यापक, न्यू इंग्लिश स्कुल अँड जुनिअर कॉलेज, वसईसाहित्य येण्याआधीच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मंडळाकडून घेण्यात आला त्यामुळे सध्या तरी शाळांमध्ये साहित्य आले नाही मात्र लवकरच ते येण्याची अपेक्षा आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची अतिरिक्त ड्युटी ही कोरोना सेवेत असल्याने साहित्य संभाळण्यासाठी, देखरेखीसाठी स्थानिक शिक्षकेतर कर्मचारी किंवा शिक्षकांनाच साहित्याची काळजी घेण्यासाठी अतिरिक्त वेळ नियोजित करून द्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने हे  म्हत्त्वाचे असल्याने त्याची जबाबदारी  आहे.- अशोक वेताळ, मुख्याध्यापक, शिशु विकास हायस्कूल, कुर्ला  

टॅग्स :दहावी