Join us
Daily Top 2Weekly Top 5

माजी सैनिकाची सराईत गुंडाशी झुंज

By admin | Updated: August 19, 2015 01:23 IST

कांदिवली पूर्व येथील समतानगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराशी माजी सैनिकाने अर्धा तास झुंज देत त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.

मुंबई : कांदिवली पूर्व येथील समतानगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराशी माजी सैनिकाने अर्धा तास झुंज देत त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. या गुंडावर नियंत्रण मिळवताना एका पोलीस शिपायाला मुका मार लागला आहे.बालाजी पाटील (२७) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याने कांदिवली परिसरात दहशत निर्माण केली होती. समीर गावडे यांचा कांदिवलीच्या क्रांतीनगर परिसरात फोटो स्टुडिओ आहे. रविवारी सायंकाळी ५च्या सुमारास गावडे पाटीलने गावडे यांच्या मानेवर चाकू ठेवून त्यांच्या खिशातील पैसे काढले. त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून दुकानाचे मालक आणि माजी सैनिक उत्तम पाटकर (६१) यांनी पाटीलला अडवत त्याच्या हातातील चाकू हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो चाकू सोडण्यास तयार नव्हता. या दोघांमध्ये अर्धा तास झटापट सुरू होती. मात्र पाटकर यांनी त्याला घट्ट धरून ठेवले. समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाटीलला ताब्यात घेतले. यात समतानगर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई मोहम्मद इक्बाल मुल्ला यांनी पाटीलला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)