Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोज सर्व्हे करून ठामपा भरते खड्डे!

By admin | Updated: June 23, 2015 23:56 IST

पावसाळा सुरु झाला की, ठाणे महापालिका हद्दीत काही वर्षांपासून खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत होते. परंतु, शहरातील रस्त्यांचे नियोजन केल्याने आता

ठाणे : पावसाळा सुरु झाला की, ठाणे महापालिका हद्दीत काही वर्षांपासून खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत होते. परंतु, शहरातील रस्त्यांचे नियोजन केल्याने आता खड्ड्यांबाबत पालिका जागरुक झाली आहे. त्यानुसार आजघडीला शहरात केवळ २३७१.५० स्क्वे.मी.चे खड्डे असून त्यातील ८६४.५० स्क्वे.मी.चे खड्डे आतापर्यंत बुजविले आहेत. आता यापुढेही जाऊन रस्त्यावरील खड्डे नियंत्रणात रहावेत म्हणून पालिकेने शहरातील खड्यांचा दररोज सर्व्हे सुरु केला असून ते तत्काळ बुजविण्याची मोहीम आखली आहे. त्यामुळे आता शहरात खड्यांचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या असलेल्या खडड््यांमध्ये सर्वाधिक १ हजार स्केअरमीटरचे खड्डे दिवा - शिळ रस्त्यावर असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.ठाणे महापालिका हद्दीत एकूण ३५६.४० किमी लांबीचे रस्त्यांचे जाळे असून पूर्वीच्या सर्व्हेक्षणात २८३ किमी लांबीचे व ६ मीटरपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते अस्तित्वात होते. सद्यस्थितीत माजिवडा ४५ किमी., मुंब्रा २० किमी.व कळवा ७ किमी या प्रमाणे रस्त्यांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान शहरात पावसाळा सुरु झाला की, दरवर्षी शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडत होते. परंतु यावर उपाय म्हणून पालिकेने तीन वर्षापूर्वी रस्त्यांच्या कामांच्या नव्या संकल्पना पुढे आणून ते विकसित करण्यास सुरवात केली. यामध्ये यूटीडब्ल्यूटी (अल्ट्रा थीन व्हाइट टॅपिंग), मास्टीक अस्फाल्ट, काँक्रीटीकरण या तंत्राद्वारे शहरातील रस्ते तयार केले आहेत.