Join us
Daily Top 2Weekly Top 5

टॅक्सी चालकांचे दरवर्षी व्हेरिफिकेशन ?

By admin | Updated: December 10, 2014 02:03 IST

आरटीओकडून बॅच मिळण्यापूर्वी चालकाचे पोलीस व्हेरिफिकेशन होते. मात्र त्यानंतर पोलिसांकडे त्याच्याविषयीची माहिती नसते.

मुंबई : आरटीओकडून बॅच मिळण्यापूर्वी चालकाचे पोलीस व्हेरिफिकेशन होते. मात्र त्यानंतर पोलिसांकडे त्याच्याविषयीची माहिती नसते. त्यामुळे दरवर्षी टॅक्सीचालकांचे  व्हेरिफिकेशन करण्यात यावे, असा निर्णय मंगळवारी आरटीओ व वाहतूक पोलिसांच्या बैठकीत घेतला़ मात्र त्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांच्या परवानगीची गरज असल्याने हा निर्णय त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
खासगी टॅक्सीचालकांबरोबरच काळ्या-पिवळ्या टॅक्सीचालकांचीही फेरतपासणी होण्याची अथवा त्यांची माहिती पोलिसांकडून घेतली जाण्याची शक्यता आहे. मात्र त्याला ‘मुंबई टॅक्सीमेन्स युनियन’ने विरोध केला आहे. प्रत्येक चालकाला पोलीस ठाण्यात बोलावून त्याची झाडाझडती घेण्यास आणि त्यानंतर त्याला व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट देण्यास आमचा विरोध आहे. बॅच देताना पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट दिले जाते. त्यामुळे प्रत्येकाची तपासणी करण्यास विरोध आहे. पण सगळ्या चालकांची एकूण माहिती हवी असल्यास ती कागदोपत्री देऊ, असे युनियनचे महासचिव ए. एल. क्वाड्रोस यांनी सांगितले.  
दरम्यान, फौजदारी दंडसंहितेतील कलम 144ने दिलेल्या अधिकारांचा वापर करून शहरातील खासगी टॅक्सी कंपन्यांच्या चालकांची पाश्र्वभूमी तपासली जाणार आहे. यासाठी कंपन्यांकडून चालकांची यादी मागवून त्या त्या पोलीस ठाण्याकरवी गुन्हेगारी पाश्र्वभूमी तपासली जाईल, अशी माहिती मुंबई पोलीस दलाचे प्रवक्ते, उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी दिली. आता मेरू, टॅब आणि इझी कॅब या फ्लिट टॅक्सी बॅचधारक असून, त्या अधिकृतरीत्या धावत आहेत. फ्लिट टॅक्सी सोडून अन्य टॅक्सी टूरिस्ट 
टॅक्सी म्हणून धावतात. त्यांच्या चालकांवर पोलिसांची करडी नजर राहील. (प्रतिनिधी)
 
युनियन विरोध 
अवैध रिक्षांचा मुंबई उपनगरीय भागात सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आले आहे. अशा 4क् हजार अवैध रिक्षा धावत असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ‘मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियन’चे नेते शशांक राव यांनी केली आहे.