मुंबई : नगराची सेवा करण्यासाठी नेमलेल्या नगरसेवकांकडून आपसेवेची आणखी एक मागणी पुढे आली आह़े वांद्रे-वरळी समुद्रसेतूवरून मोफत प्रवासाच्या मागणीनंतर केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारीतील मार्गावरूनही विनाशुल्क वाहन नेण्याची परवानगी ठरावाच्या सूचनेद्वारे पालिका महासभेपुढे मागण्यात आली आह़े
नगरसेवकांना जनतेच्या मदतीसाठी तत्पर राहावे लागत़े पण या लोकसेवेचे मोल मिळण्यासाठी नगरसेवकांकडून अनेक मागण्या आतार्पयत होत आल्या आहेत़ या वेळीस नगरसेवकांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई पोर्ट ट्रस्ट, माझगाव डॉक आणि विविध सरकारी प्राधिकरणांच्या अखत्यारीतील रस्त्यांवरून मोफत वाहन
नेण्याची सवलत हवी आहे, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक परमिंदर भामरा यांनी महासभेपुढे केली
आह़े संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा मार्ग वापरण्यासाठी 5क् रुपये व माणशी 15रुपये शुल्क आकारले जात़े नगरसेवक नागरी कामानिमित्त प्रवास करीत असल्याने घटनास्थळी वेळेत पोहोचण्यासाठी सरकारी रस्त्याचा वापर होत असतो़ त्यामुळे सरकारी रस्त्यांवरून वाहन विनाशुल्क नेण्याची सूट नगरसेवकांना
देण्यात यावी, असा युक्तिवाद भामरा यांनी मांडला आह़े ही
सूचना पालिका महासभेत मंजूर केल्यानंतर आयुक्तांमार्फत राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल़ (प्रतिनिधी)
2क्क्7
पासून लॅपटॉप देण्यात येत आह़े गेल्या वर्षी मोबाइल फोन व 12क्क् रुपयांर्पयत बिलाची रक्कम, बेस्टचा मोफत प्रवास, वातानुकूलित बसगाडय़ांमधून मोफत प्रवास मिळत आह़े
नगरसेवकांच्या
प्रलंबित मागण्या
नगरसेवकांना निवृत्तिवेतन, विमा योजनेचा लाभ, जलतरण तलावाचे मोफत सदस्यत्व, कार्यालयासाठी तसेच घरासाठी भूखंड, मुंबईतील सुपर स्पेशालिटी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार, वांद्रे-वरळी समुद्रसेतूवरून मोफत प्रवास अशा मागण्या यापूर्वी करण्यात आल्या आहेत़