Join us

पहिले लग्न झाले असतानाही दुसऱ्या लग्नाचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:04 IST

पत्नीने घेतली पोलिसांत धावपहिले लग्न झाले असतानाही दुसऱ्या लग्नाचा घाटपत्नीने घेतली पोलिसांत धावलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई ...

पत्नीने घेतली पोलिसांत धाव

पहिले लग्न झाले असतानाही दुसऱ्या लग्नाचा घाट

पत्नीने घेतली पोलिसांत धाव

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : घटस्फोट झाल्याचे सांगून दुसऱ्या लग्नाचा घाट घालणाऱ्या पतीसह त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध विनोबा भावे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

कुर्ला परिसरात २९ वर्षीय तक्रारदार तरुणी कुटुंबीयांसोबत राहते. २८ जून रोजी आरोपी पती सचिन, त्याची आई गेंदूबाई आणि दीर संदीप यांनी तक्रारदार तरुणीची भेट घेत तिला सचिनचा पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्याचे सांगून विवाहासाठी मागणी घातली. मुलगा चांगला वाटल्याने तिनेही होकार दिला. ठरल्याप्रमाणे विवाह सोहळा पार पडला.

दरम्यान, काही दिवसांतच सचिन, गेंदूबाई आणि संदीप यांचे बिंग फुटले. त्याचा घटस्फाेट झाला नसल्याचे समोर आल्यामुळे सासरच्या मंडळींनी तिलाच त्रास देण्यास सुरुवात केली. पुढे नांदवायला नकार देत माहेरी पाठवले. नांदायचे असल्यास आणखी सव्वा लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप तरुणीने केला. त्यानुसार पोलिसांनी नुकताच याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून ते अधिक तपास करत आहेत.

...............................