दिवसभर ढगाळ वातावरण : मुंबईसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत तापमानात वाढ
मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रचा विपरीत परिणाम म्हणून शुक्रवारी मध्यरात्री मुंबई शहरासह उपनगरालादेखील अवकाळी पावसाने झोडपून काढले. तब्बल एक तास पडलेल्या पावसामुळे वातावरणात बदल झाले आणि शनिवारी मुंबई दिवसभर मळभली.
गेल्या 24 तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. मराठवाडय़ात ब:याच ठिकाणी, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. शिवाय मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण आणि गोव्याच्या काही भागांत तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविले. पुढील 24 तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)
मुंबईत पडलेल्या अवकाळी पावसामुळे आझाद मैदानात असे पाणी साचले होते. या पावसामुळे शहराच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. उत्तरेहून दक्षिणोकडे वाहणा:या थंड वा:यामुळे शहराचे तापमान 18 अंशावरून 22 पोहोचले.