Join us

ऑगस्ट अखेरीसही बहुतांश महाराष्ट्र कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:05 IST

सचिन लुंगसेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात झालेल्या हवामान बदलामुळे मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. ...

सचिन लुंगसे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात झालेल्या हवामान बदलामुळे मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह उर्वरित विभागातही पावसाने बऱ्यापैकी जोर पकडला आहे. असे असले तरीही मधल्या काळात खंड पडल्याने राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांत पावसाची टक्केवारी उणे आहे. चार जिल्हे पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत तर केवळ नऊ जिल्ह्यांत पाऊस २० टक्के ते ५९ टक्क्यांच्या आसपास नोंदविण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांत पावसाने सरासरी गाठली आहे. असे असले तरी यापैकी एकाही जिल्ह्यात साठ टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झालेली नाही.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडील माहितीनुसार, महाराष्ट्रात १०७ टक्के मान्सूनची नोंद झाली आहे. सरासरीच्या तुलनेत हा पाऊस ७ टक्के अधिक आहे. १ जूनपासून महाराष्ट्रात पडलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्हे पावसाच्या उणे /घट १९ ते १९ टक्क्यांच्या वर्गवारीत आहेत. तर केवळ नऊ जिल्ह्यांत पाऊस २० टक्के ते ५९ टक्क्यांच्या आसपास नोंदविण्यात आला आहे. या जिल्ह्यांत मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, जालना आणि परभणीचा समावेश आहे. उर्वरित जिल्ह्यांत पावसाने सरासरी गाठली आहे. असे असले तरी यापैकी एकाही जिल्ह्यात साठ टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झालेली नाही. नंदूरबार, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली हे जिल्हे आजही पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

----------------

सरासरीच्या तुलनेत पडलेला पाऊस टक्क्यांत (अधिक आणि उणे / घट)

जिल्हे आणि पाऊस टक्क्यांत

मुंबई ७

मुंबई उपनगर ३६

ठाणे १०

पालघर उणे ३

रायगड १३

रत्नागिरी २९

सिंधुदुर्ग २६

कोल्हापूर २९

सांगली १५

सातारा ३७

सोलापूर १२

पुणे ९

अहमदनगर २०

औरंगाबाद २७

बीड १८

जालना ४९

परभणी ४६

उस्मानाबाद ६

लातूर उणे ३

नांदेड ९

हिंगोली उणे ६

नाशिक १

नंदुरबार उणे ४५

धुळे उणे ४

जळगाव उणे १८

बुलडाणा उणे १९

अकोला उणे ९

वाशिम ७

यवतमाळ ८

वर्धा उणे ८

नागपूर १

चंद्रपूर उणे १

भंडारा उणे १२

गोंदिया उणे २०

गडचिरोली उणे २१