Join us

नव्वदी पार करूनही ‘नो एंट्री’

By admin | Updated: June 18, 2015 00:51 IST

मुंबई विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील एफवाय प्रवेशाची पहिली लिस्ट मंगळवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आली.

नवी मुंबई : मुंबई विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील एफवाय प्रवेशाची पहिली लिस्ट मंगळवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आली. नवी मुंबईतील महाविद्यालयांचा कट आॅफ पाहता हा आकडा मागील वर्षीपेक्षा चार ते पाच टक्क्यांनी वाढला आहे. नामांकित कॉलेजचा पहिला कट आॅफ ९० ते ९५ टक्क्यांच्या घरात पहायला मिळाला.यंदाचा निकालात सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांमध्ये नव्वदी पार केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याचे पहायला मिळाले. यंदाच्या निकालाने महाविद्यालयांच्या कट आॅफचा टक्का वाढल्याने प्रथम श्रेणी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची चिंता भेडसावत आहे. बायोटेक, बायोकेमिस्ट्री या कोर्सेसबरोबरच बीएस्सी, बीएस्सी आयटी, बीएस्सी कॉम्युटर सायन्स, बीकॉम, बीएमएम, बीएमएस या कोर्सेसकडेही विद्यार्थ्यांचा कल दिसून आला. बऱ्याचशा कॉलेजमध्ये दुसऱ्या मेरीट लिस्टनंतरच अ‍ॅडमिशन प्रक्रिया थांबवणार असल्याची माहिती कॉलेज प्रशासनाकडून देण्यात आली. नवी मुंबईमधील एसआयईएस कॉलेज, मॉडर्न कॉलेज, आयसीएल कॉलेज, तेरणा महाविद्यालय, डी. वाय. पाटील महाविद्यालय, भारती विद्यापीठ या सर्वच महाविद्यालयांचा कट आॅफ ३ ते ४ टक्क्यांनी वाढला आहे. मेरीट लिस्ट पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाबाहेर गर्दी केली होती. (वार्ताहर)कामोठेत दाखले वाटप शिबिराचे आयोजन-पनवेल : महाविद्यालयात अ‍ॅडमिशनसाठी वास्तव्य, नॉन क्रिमिलियर, जातीच्या दाखल्यांची आवश्यकता असते. त्यासाठी विद्यार्थ्यांची संबंधित कार्यालयात गर्दी होत आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय दूर व्हावी यासाठी कामोठेत शनिवारी २० रोजी दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सेक्टर ११ येथील सुषमा पाटील विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात उत्पन्न, स्थानिक वास्तव्य, जात प्रमाणपत्र, वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास, नॉन क्रिमिलियर आदी शासकीय दाखले उपलब्ध होणार आहेत. शिबिरार्थींनी दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे गरजेचे आहे.